पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हा अर्थसंकल्प मुठभर भांडवलदारांसाठीच: मायावती

मायावती

बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी आजचा अर्थसंकल्प निराश करणारा असल्याचे म्हटले आहे. आजचा अर्थसंकल्प मुठभर भांडवलदारांना सोडून इतर सर्वांसाठी निराश करणारा असल्याची, टीका मायावती यांनी केली आहे. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील दुसरा अर्थसंकल्प आज सादर केला. 

राहुल गांधींच्या त्या प्रश्नावर PM मोदींनी असा दिला रिप्लाय

मायावती यांनी सांगितले की, 'या अर्थसंकल्पातून देशातील गरीब, प्रामाणिक आणि कष्टकरी लोकांची दिवसेंदिवस वाढणारी समस्या सोडवणे शक्य नाही. तसंच, त्यांनी मोदी सरकारच्या धोरणांवर सवाल उपस्थित केला आहे. 'सरकारी मालमत्तांची विक्री केल्यानं देशाचं भलं कसं होईल?असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. 

शाहिन बागमध्ये गोळीबार; तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात

मायावती यांनी पुढे असे सांगितले की, 'लोकांकडे काम नाही. न मेहनत करणाऱ्या लोकांना योग्य वेतन मिळत आहे. तसंच देशाच्या बाजारपेठेत मागणी नाही त्यामुळे देशाची संपूर्ण अर्थव्यवस्था ढासळली आहे. यावर तोडगा या अर्थसंकल्पातून काढणे खूप कठीण आहे.' 

आकडे दाखवून लोकांची दिशाभूल करणारा अर्थसंकल्प: इम्तियाज जलील

या अर्थसंकल्पामुळे भविष्यात लोकांची समस्या कमी होण्याऐवजी आणखी वाढण्याची शक्यता आहे, असे त्यांनी सांगितले. तसंच, अर्थसंकल्पात प्राप्तिकरात थोडासा दिलासा मिळाला मात्र तो सुध्दा अटींसह. ही सूट सोपी आणि बिनशर्त असती तर बरे झाले असते' असे मायावतींनी सांगितले. 

भारताला नवभारताकडे नेणारा सुधारणावादी अर्थसंकल्प : देवेंद्र फडणवीस