पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शास्त्रज्ञांच्या पाठीवर सगळ्यांकडून कौतुकाची थाप, मायावती म्हणाल्या...

मायावती

चांद्रयान २ मोहिमेमध्ये विक्रम लँडरचा संपर्क तुटल्यामुळे सध्या या मोहिमेबद्दल अनिश्चितता आहे. चंद्रापासून अवघ्या २.१ किलोमीटरवर असताना विक्रम लँडरचा संपर्क तुटला. यामुळे इस्रोतील शास्त्रज्ञांच्या चेहऱ्यावर गंभीरतेचे भाव उमटले. या सगळ्या पार्श्वभूमीवर देशातील विविध नेत्यांनी, उद्योगपतींनी शास्त्रज्ञांचे मनोधैर्य उंचावण्याचे काम केले आहे. इस्रोतील शास्त्रज्ञांनी आतापर्यंत केलेल्या कामांची सर्वांनी प्रशंसा केली आहे.

बसपाच्या प्रमुख मायावती यांनी म्हटले आहे की, इस्रोच्या शास्त्रज्ञांनी आतापर्यंत जे यश मिळवले आहे ते गर्व करण्यासारखेच आहे. त्याचे कौतुकच केले पाहिजे. जे घडले त्यामुळे निराश, हताश न होता पुढे सरकत राहिले पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे.

उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, विक्रम लँडरचा संपर्क तुटलेला नाही. चांद्रयान २ च्या ह्रदयाचे ठोके देशातील प्रत्यके नागरिकाला जाणवत आहेत. तो कानात सांगतो आहे की पहिल्या प्रयत्नात यश नाही मिळाले तर पुन्हा प्रयत्न करा.