पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अखिलेश यांच्या भूमिकेसंदर्भात मायावतींनी केला गौफ्यस्फोट

अखिलेश यादव आणि मायावती

बसपा सुप्रिमो मायावती यांनी लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यावर हल्ला केला. लोकसभा निवडणुकीत अखिलेश यादव मुस्लिमांना अधिक तिकिट देण्यास इच्छुक नव्हते, असा गौफ्यस्फोट मायावती यांनी केला आहे. 

मायावती म्हणाल्या की, महाआघाडी झाल्यानंतर अखिलेश मुस्लिमांना अधिक तिकिट देण्याच्या बाजून नव्हते. त्यांच्या मताचे ध्रुवीकरण होवून त्याचा थेट भाजपला फायदा होईल, असे त्यांना वाटत होते. या विधानातून पुढील काळात महाआघाडीची सर्व दरवाजे बंद झाल्याचे संकेतच मायावतींनी दिले.  

मायावतींनी भाऊ-भाच्याकडे दिली मोठी जबाबदारी

लखनऊ येथे पार पडलेल्या पार्टीच्या बैठकीनंतर मायायवती यांनी महाआघाडीतील बिघाडीवर भाष्य केले. मायावती म्हणाल्या की, २३ मे रोजी डिंपल यादव यांचा पराभव झाल्यानंतर अखिलेश यांना फोन केला होता. त्यानंतर ३ जूनला महाआघाडी तुटेपर्यंत अखिलेश यांनी फोन केला नाही, असे सांगत लोकसभा निवडणुकीतील पराभवाचे खापर त्यांनी अखिलेश यादव यांच्यावर फोडले. 

लोकसभेत यादव समाजाची मतं महाआघाडीला मिळाली नाहीत. त्यांची मते जर महाआघाडीला मिळाली असती तर बदायू, फिरोजाबाद आणि कन्नोज जागेवर सपाचा पराभव झाला नसता. ही सर्व मते भाजपकडे वळली, असेही त्या यावेळी म्हणाल्या आहेत. 

श्यामाप्रसाद मुखर्जी मृत्यूः राज्यपालांचे नेहरु, अब्दुल्लांवर आरोप

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:bsp supremo mayawati big attack on akhilesh yadav they did not want to give more tickets to muslims in lok sabha