पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'व्यक्तिगत आणि राजकीय स्वार्थासाठी भाजपकडून सत्तेचा दुरुपयोग'

मायावती

बसपाच्या अध्यक्षा मायावती यांचा आज ६४ वा वाढदिवस आहे. त्यांचा वाढदिवस जनकल्याणकारी दिवस म्हणून साजरा केला जातो. वाढदिवसानिमित्त मायावती यांनी लखनऊ येथे पत्रकार परिषद घेत मोदी सरकार आणि काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेससारखीच भाजप देखील आपल्या व्यक्तिगत आणि राजकीय स्वार्थासाठी सत्तेचा दुरुपयोग करत असल्याचा आरोप मायावती यांनी केला आहे.

सिंचन घोटाळा : अजित पवार यांची आता हायकोर्टात धाव

मायावती यांनी देशातील आर्थिक परिस्थितीसंदर्भात बोलताना सांगितले की, देशाची अर्थव्यवस्था मंदीची शिकार झाली आहे. काँग्रेसचे सरकार असताना देशातील जनतेने ही परिस्थिती पाहिली आहे. ज्यासाठी जनतेने काँग्रेसला सत्तेतून बाहेर काढले होते. केंद्रातील मोदी सरकार सुध्दा काँग्रेसच्याच मार्गावर चालत आहे अशी टीका मायावती यांनी केली आहे.

नव्या मंत्र्यांचे बंगले नूतनीकरणाचा खर्च चक्रावून टाकणारा

पुढे मायावती यांनी असे सांगितले की, काँग्रेसप्रमाणेच केंद्र सरकारनेही जनहिताचे आणि कल्याणाचे विषय पणाला लावले आहेत. आजही दारिद्र्य, निरक्षरता, महागाई, हिंसा आणि तणावाचे वातावरण देशात कायम आहे, अशी टीका मायावती यांनी केली आहे. देशातील गरीब, आदिवासी, मुस्लिम आणि दुसऱ्या धर्माचे अल्पसंख्याक लोकं या सरकारमुळे चिंतेत आहेत. भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशात तणावाचे वातावरण असल्याची टीका मायावती यांनी केली आहे. 

लग्नाचे आमिष दाखवून महिलेशी शारीरिक संबंध, जामिनास कोर्टाचा नकार

बसपा देशातील गरीब जनतेच्या सोबत आहे असे आश्वासन मायावती यांनी दिले. तसंच, भाजपने एनआरसी, सीएए आणि एनपीआरचा हट्टा सोडला पाहिजे. देशातील जनता बेरोजगारीमुळे त्रस्त आहे. महागाईने सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. मोदी सरकार हे भांडवलदारांचे सरकार आहे, अशी टीका मायावती यांनी केली आहे. 

Indigo च्या वैमानिकावर ७५ वर्षीय वृद्ध प्रवाशाला धमकावल्याचा आरोप