पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

गरिबांची मते विकत घेऊन भाजप सत्तेत आला; मायावतींचा आरोप

मायावती

बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती भावाविरोधात केलेल्या कारवाईमुळे चांगल्याच भडकल्या आहेत. शुक्रवारी सकाळी मायावती यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. मायावती यांचा भाऊ आणि बसपाचे उपाध्यक्ष आनंद कुमार यांच्या नोएडा येथील बेनामी प्लॉटवर आयकर विभागाने छापा टाकत तो जप्त केला. या प्लॉटची किंमत ४०० कोटी रुपये ऐवढी आहे. आयकर विभागाच्या कारवाईविरोधात मायावती यांनी पत्रकार परिषद घेतली. 'निवडणूक काळात गरिबांची मतं विकत घेऊन भाजप सत्तेमध्ये आला' असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

कर्नाटकमध्ये दुपारी दीड वाजता काय घडणार याकडे सगळ्यांचे लक्ष

दरम्यान,' भाजपला वंचित आणि दलित समाजातील लोकं पुढे जात असल्याने त्रास होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसंच, भाजप आरक्षणाला संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पहिल्या निवडणुकीदरम्यान २ हजार कोटी रुपयांची संपत्ती भाजपच्या खात्यात गेली त्याचा हिशोब अजून दिला गेला नाही. याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे. त्याच पैशाने भाजपने गरिबांची मतं खरेदी करत सत्तेत आली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसंच, जर भाजप स्वत:ला हरिशचंद्र समजून चालत असेल तर त्यांनी पक्षातील सर्वांची एकदा चौकशी करुन घ्यावी. की, ते राजकारणात येण्याआधी त्यांच्याकडे किती संपत्ती होती आणि आता किती संपत्ती आहे.

कुलभूषण जाधव यांना कायदेशीर मदत देऊ - पाकिस्तान

तर, जेव्हापासून भाजप सत्तेमध्ये आला आहे तेव्हापासून संपूर्ण देशामध्ये अब्ज रुपयांची संपत्ती पक्षाचे कार्यालय खरेदीमध्ये खर्च केली आहे. हा पैसा कुठून आला?, काय ही बेनामी संपत्ती नाही ना? याचा देखील खुलासा झाला पाहिजे अशी मागणी मायावती यांनी केली आहे. पुढे त्यांनी असे म्हटले आहे की, आदिवसी, दलित यांनी भाजपला घाबरण्याची गरज नाही. तसंच, जर कोणावर अन्याय झाला तर आमचा पक्ष मागे हटणार नाही. त्या व्यक्तीला न्याय मिळवून देईल, असा विश्वास मायावती यांनी व्यक्त केला आहे.

शिवसेनेकडून आदित्य ठाकरेच मुख्यमंत्रीपदाचे दावेदार