पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'पाक जिंदाबाद म्हणणाऱ्या तरुणीचे नक्षलवाद्यांशी कनेक्शन'

बी.एस येडीयुरप्पा

सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधातील बंगळुरु येथील सभेत 'पाकिस्तान जिंदाबाद' अशी घोषणाबाजी करणारी तरुणी नक्षलवादी असल्याचा आरोप कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी केला आहे. अमूल्या या तरुणीचा नक्षलवाद्यांची संबंध असून तिला जामीन मंजूर न करता कठोर शिक्षा व्हायला हवी, अशी प्रतिक्रिया येडियुरप्पा यांनी दिली आहे. 

'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा देणाऱ्या तरुणीविरोधात देशद्रोहाचा गुन्हा

बंगळुरुमध्ये सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात आयोजित सभेच्या व्यासपीठावरुन अमूल्या लियोन हिने 'पाकिस्तान जिंदाबाद' अशी घोषणाबाजी केली होती. एमआयमचे प्रमुख आणि विद्यमान खासदर असदुद्दीन ओवेंसी देखील यावेळी व्यासपीठावर होते. पोलिसांच्या मदतीने तरुणीला व्यासपीठावरु खाली नेण्यात आले. याप्रकरणात संबंधित तरुणीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 

Video: ओवेसींच्या सभेत तरुणीकडून 'पाकिस्तान जिंदाबाद' अशी घोषणाबाजी

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा म्हणाले की, पाकिस्तान जिंदाबादची घोषणा देणाऱ्या अमूल्याला जामीन मंजूर करु नये. तिच्या वडिलांनी देखील तिला समर्थन करणार नसल्याचे म्हटे आहे. तिचा नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचे सिद्ध होत असून तिला कठोर शिक्षा करावी, असे येडीयुरप्पा यांनी म्हटले आहे. अमूल्याने गुरुवारी एमआयमचे अध्यक्ष आणि विद्यमान खासदार असदुद्दीन ओवेसींच्या कार्यक्रमात व्यासपीठावर येऊन पाकिस्तान जिंदाबाद अशी घोषणा दिली होती. अचानकपणे घडलेल्या या प्रकारामुळे आयोजकांमध्येही तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले. ओवेसींनी देखील या घटनेचा निषेध केला होता. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:bs Yeddyurappa said It is clear that the girl who raised the slogan of Pakistan Zindabad is associated with Naxalites