पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'काश्मीरच्या मुद्यावरुन आंदोलन करणाऱ्यांची गय केली जाणार नाही'

काश्मीरमधील कलम ३७० हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय केंद्र सरकारने घेतला होता.

काश्मीरमधील कलम ३७० हटवण्याच्या विरोधात इंग्लंडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनाला समर्थन दिले जाणार नाही, असे इंग्लंड सरकारने स्पष्ट केले आहे. २७ ऑक्टोबरला दिवाळीच्या दिवशी इंग्लंडमध्ये काश्मीरमधील कलम ३७० हटवण्याच्या निर्णयाबद्दल विरोध दर्शवण्यासाठी आंदोलन छेडण्यात आले आहे. भारताने यासंदर्भात लिखित स्वरुपात आक्षेप नोंदवला आहे.

चेंबूरमधील अंत्ययात्रेत हिंसाचार: २०० जणांवर गुन्हा ३३ जण अटकेत

या आंदोलनात सहभागी होणाऱ्या गटाला खलिस्तान समर्थकांचा देखील पाठिंबा मिळाला आहे. मात्र काश्मीर संदर्भातील विरोधी आंदोलनाला थारा दिला जाणार नसल्याची भूमिका इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी स्पष्ट केली आहे.  २७ तारखेला डाउनिंग स्ट्रीटपासून मोर्चाला सुरुवात होणार आहे. इंडिया हाऊसजवळ या मोर्चाचा समारोप होणार आहे. जवळपास १० हजार लोक या मोर्चात सहभागी होणार असल्याने स्कॉटलंड यार्डमध्ये कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. भारत सरकारने याबाबत ब्रिटीश सरकारच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे.

'चिदंबरम यांचे वजन ५ किलोने कमी झाले, आता तरी सुटका करा'

भारत सरकारने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी  इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांच्यासोबत यासंदर्भात चर्चा केली आहे. सुरक्षिततेचे योग्य ती पावले उचलू असे आश्वासन ब्रिटन सरकारने दिले आहे. उल्लेखनिय आहे की, यापूर्वी सप्टेंबरमध्ये असा प्रकारचा विरोध दर्शनवण्यात आला होता. ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्तालयाजवळ आंदोलकांनी निदर्शने केली होती.