पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ब्रिटनच्या महिला खासदाराचा भारत सरकारवर आरोप

डेबी अब्राहम्स

जम्मू काश्मीरमधील कलम ३७० चा विरोध करणाऱ्या ब्रिटनच्या महिला खासदाराने भारत सरकारवर आरोप केला आहे. व्हिसा वैध असताना देखील भारतीय विमानतळावरुन परत पाठवल्याचा दावा ब्रिटनच्या खासदार डेबी अब्राहम्स यांनी केला आहे.  मात्र भारत सरकारने त्यांनी केलेला आरोप फेटाळून लावला आहे. त्यांचा ई व्हिसा रद्द केल्याची माहिती त्यांना देण्यात आली होती, असे भारत सरकारने स्पष्ट केले आहे.  

नवे डेथ वॉरंट; निर्भयाच्या दोषींना ३ मार्चला सकाळी ६ वाजता फाशी

लेबर पार्टीच्या सदस्या डेबी अब्राहम्स या काश्मीरमधील ऑल पार्टी पार्लियामेंट्री समूहाच्या अध्यक्षा देखील आहेत. सोमवारी सकाळी दिल्लीच्या विमानतळावर उतरल्यानंतर ई व्हिसा रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली, असे डेबी अब्राहम्स यांनी म्हटले आहे. व्हिसा ऑक्टोंबर २०२० पर्यंत वैध असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. ट्विटरच्या माध्यमातूनही डेबी अब्राहम्स यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

मांसाहारी लोकांना शिक्षा देण्यासाठी कोरोना अवतार, हिंदू महासभेचे

त्यांनी ट्विटमध्ये लिहिलंय की, मी माझ्या भारतीय नातेवाईकांना भेटण्यासाठी आले होते. माझ्यासोबत भारतीय स्टाफ देखील होता. सामाजिक न्याय आणि मानवी हक्कासाठी लढा सुरुच राहीन, असा उल्लेखही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये केलाय.   दुसरीकडे भारतीय गृहमंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी त्यांचा दावा खोडून काढला आहे. ब्रिटनच्या खासदारांना त्यांचा  व्हिसा अवैध असल्याची माहिती यापूर्वीच देण्यात आली होती. तरी देखील त्या दिल्लीमध्ये आल्या होत्या, असे त्यांनी म्हटले आहे.