पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ब्रिटनचे प्रिन्स चार्ल्स यांना कोरोनाची लागण

प्रिन्स चार्ल्स (संग्रहित छायाचित्र)

जगभरात कोरोना विषाणूचा कहर माजला आहे. त्यातच आता ब्रिटनमधून मोठी बातमी आली आहे. ब्रिटनचे प्रिन्स चार्ल्स यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 'एएनआय'ने दिलेल्या वृत्तानुसार, ७१ वर्षीय प्रिन्स चार्ल्स यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. क्लेरंस हाऊसने बुधवारी याची घोषणा केली. प्रिन्स चार्ल्स यांची चाचणी पॉझिटिव्ह असली तरी त्यांची प्रकृती चांगली असल्याचे क्लेरंस हाऊसने म्हटले आहे. 

देशांतर्गत स्पर्धेचे अधिकार सट्टेबाज कंपनीने खरेदी केले, पाककडून कबुली

प्रिन्स चार्ल्स यांची कोरोना चाचणी स्कॉटलँडमध्ये करण्यात आली होती. तिथे ते पत्नी कॅमिला यांच्याबरोबर होते. कॅमिला यांचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. 
सरकार आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार प्रिन्स चार्ल्स हे आता स्कॉटलँडमधील घरात एकट्याने राहत आहेत. त्यांनी स्वतःला इतरांपासून विलग केल्याचे क्लेरंस हाऊसच्या एका प्रवक्त्याने सांगितले.

लॉकडाऊननंतर ऍमेझॉन, फ्लिपकार्ट, बिग बास्केट यांच्या सेवांवर हा परिणाम

महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांना यापूर्वीच बर्मिंगहॅम पॅलेस सोडावे लागले होते. त्यांना विंडसर कॅसलला नेण्यात आले आहे. यापूर्वी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी देशात कोरोना विषाणूचा फैलाव होऊ नये म्हणून लोकांच्या हालचालींवर तीन आठवड्यांची बंदी घातली आहे.