ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे कोरोना संक्रमणातून पूर्णपणे बरे झाले असून त्यांनी या विषाणूचा सामना करण्यासाठी देशाचे नेतृत्व पुन्हा आपल्या हाती घेतले आहे. या विषाणूविरोधात लढण्यासाठी ब्रिटनची रणनीति तयार करण्यासाठी कार्यालयात दाखल झाले आहेत. एक महिन्यापूर्वी त्यांना कोरोना विषाणूची लागण झाली होती.
मुंबईतल्या या दोन वॉर्डमध्ये १ हजारांहून जास्त कोरोनाग्रस्त
जॉन्सन यांना १२ एप्रिलला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यानंतर बकिंगमशायर शहरातील बाहेरील भागात असलेल्या पंतप्रधान निवासस्थान चेकर्स येथे राहत होते. यावेळी देशाचा कारभार परराष्ट्र मंत्री डॉमिनिक राब यांच्या हातात होता. बीबीसीने दिलेल्या माहितीनुसार, जॉन्सन सोमवारी कोविड-१९ वरुन मंत्रिमंडळाच्या नियमित बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवू शकतात. त्यानंतर ते ज्येष्ठ मंत्री आणि अधिकाऱ्यांशी चर्चा करतील.
भारतात कोरोनाबाधितांचा आकडा २७ हजार पार, ८७२ रुग्णांचा मृत्यू
जॉन्सन यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याच्या वृत्तास २७ मार्चला पुष्टी मिळाली होती. त्यानंतर एक महिन्यानंतर ते १० डाऊनिंग स्ट्रीटला परतले होते. पंतप्रधानांना लॉकडाऊन बाबत निर्णय घ्यायचा आहे. दि. ७ मे पर्यंत देशात तो लागू आहे. सरकारकडून याची समीक्षा केली जाईल.
अमेरिकेत कोरोनाचं तांडव, आतापर्यंत ५४,००० जणांचा मृत्यू
ब्रिटनमध्ये रविवारी ४१३ जणांचा मृत्यू झाला. तर कोरोना बाधितांची संख्या २०, ७३२ पर्यंत पोहोचली आहे.