पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पॅरिसमध्ये भारताच्या राफेल प्रकल्पाची माहिती चोरण्याचा प्रयत्न

राफेल

पॅरिसमधील भारतीय राफेल प्रकल्पातील व्यवस्थापन कार्यालय अज्ञात व्यक्तींनी फोडण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना रविवारी रात्री घडली. राफेल विमानाशी संबंधित गोपनीय माहिती चोरण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येते.

राफेल प्रकरण: SC कडून पुनर्विचार याचिकेवरील निर्णय राखीव

पॅरिसमधील उपनगरात भारतीय वायू दलाचे राफेल प्रकल्पावरील कार्यालय आहे. हे कार्यालय फोडण्याचा प्रयत्न केला गेला. कार्यालयातून हार्ड डिस्क किंवा कागदपत्रे चोरीला गेलेली नाहीत. असे करण्यामागे काय उद्देश होता, हे अद्याप समजू शकलेले नाही, असे वृत्त एएनआयने भारतीय नौदलातील सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. 

ग्रूप कॅप्टन रँकच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली राफेल प्रकल्पाचे काम चालते. ही टीम ३६ राफेल विमानाशी संबंधित समस्या तसेच भारतीय कर्मचाऱ्यांना या विमानाशी संबंधित प्रशिक्षण देण्याचे काम करते. 

यूपीएच्या काळात १ लाख कोटींची कामं मिळाली, रिलायन्सचे राहुल गांधींना प्रत्युत्तर

पॅरिसमध्ये सेंट क्लाउड येथील एका कॉम्पलेक्समध्ये हे कार्यालय आहे. पोलिसांकडून याचा तपास केला जात आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या चोरट्यांचा मुख्य उद्देश हा गोपनीय माहितीची चोरी करणे किंवा पैसे लंपास करणे हा होता. 

भारतीय वायूदलाने याबाबत संरक्षण दलाला आणि फ्रेंच पोलिसांना याबाबत विस्तृत माहिती दिल्याचे सरकारने सांगितले आहे.