पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शताब्दी एक्स्प्रेसमधला ब्रेड अनारोग्यदायी, अहवालातून समोर

प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबई- अहमदाबाद शताब्दी एक्स्प्रेसमध्ये ७ जानेवारीला प्रवाशांना खाण्यासाठी देण्यात आलेला ब्रेड हा धोकादायक असल्याचं पश्चिम रेल्वेच्या अंतर्गत चौकशी अहवालातून समोर आलं आहे. ब्रेड- बटरपैकी ब्रेडमध्ये बुरशी आढळली आहे, तर बटर सुरक्षित असून त्याचं योग्य पॅकेजिंग मात्र  केलं नव्हतं असं चौकशी अहवालात आढळून आलं आहे. प्रवाशांना खराब ब्रेड  दिल्याबद्दल आयआरसीटीसीनं कंत्राटदाराला २ लाखांचा दंड ठोठावला असून त्याचं कंत्राट रद्द केलं आहे. 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांना पंतप्रधान मोदी, फडणवीसांकडून आदरांजली

गेल्या काही दिवसांपासून एक्स्प्रेसमध्ये खराब दर्जाचं अन्नपदार्थ प्रवाशांना दिलं जात असल्याच्या तक्रारी वारंवार प्रवाशांकडून येत आहेत. ७ जानेवारी रोजी मुंबई- अहमदाबाद शताब्दी एक्स्प्रेसमध्ये  खाण्यासाठी विकत घेतलेला ब्रेड बटर खराब होता अशी तक्रार ३६ प्रवाशांनी केली होती. प्रवाशांच्या तक्रारीनंतर ८ जानेवारीला पश्चिम रेल्वेनं अंतर्गत चौकशी समिती स्थापन केली या समितीनं १६ जानेवारीला अहवाल पश्चिम रेल्वेला सादर केला. यात ब्रेड हा अनारोग्य आणि धोकादायक असल्याचं समोर आलं आहे. 

 

'उद्धव ठाकरेंच्या नियोजित अयोध्या दौऱ्याचा सरकारशी संबंध नाही'

चौकशी समितीच्या अहवालानुसार ४ प्रवाशांना  ब्रेड खाल्यानंतर त्रास झाला होता. सुरत रेल्वे स्थानकावर या प्रवाशांनी वैद्यकिय मदतही घेतल्याचं यात  समोर आलं आहे. काही दिवसांपूर्वी जनशताब्दी आणि तेजस एक्स्प्रेसमध्येही प्रवाशांना खराब अन्न वाट्याला आलं होतं. यावेळी आयआरसीटीसीनं कंत्राटदारांना १ लाखांचा दंड सुनावला होता.