पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

... हे आहेत प्रजासत्ताक दिन संचलनासाठी यंदाचे प्रमुख पाहुणे

ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जेर बोलसोनारो

प्रजासत्ताक दिनानिमित्त राजधानी नवी दिल्लीत राजपथावर होणाऱ्या संचलनाचे प्रमुख पाहुणे कोण असणार, याची उत्सुकता सर्व देशवासियांना असते. येत्या रविवारी, २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या संचलनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जेर बोलसोनारो येणार आहेत. मंगळवारी औपचारिकपणे केंद्र सरकारकडून याची घोषणा करण्यात आली.

प्रियांका गांधींच्या सक्रीय राजकारणाचे एक वर्ष आणि सहा मुद्दे

प्रजासत्ताक दिनानिमित्त दरवर्षी भारताकडून मित्र आणि सहयोगी देशांच्या प्रमुखांना भारतात निमंत्रित केले जाते. या दिवशी राजपथावर होणाऱ्या संचलनाचे तेच प्रमुख पाहुणे असतात. आतापर्यंत विविध देशांचे प्रमुख या कार्यक्रमासाठी आलेले आहेत. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे सुद्धा प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या संचलनासाठी आले होते. 

भारतातील ६३ अब्जाधीशांकडे देशाच्या बजेटपेक्षा अधिक संपत्ती

ब्राझीलचे माजी राष्ट्राध्यक्ष मायकल टेमर हे ऑक्टोबर २०१६ मध्ये ब्रिक्स देशांच्या परिषदेसाठी भारतात आले होते. तर गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये नरेंद्र मोदी याच वार्षिक परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्राझीलला गेले होते.