पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अ‍ॅमेझॉनच्या जंगलातील भीषण आग विझवण्यासाठी जी- ७ देशांची मदत ब्राझीलनं नाकारली

अ‍ॅमेझॉन आग

अ‍ॅमेझॉनचं जंगल गेल्या काही दिवसांपासून लागलेल्या भीषण आगीमुळे धुमसतंय. हे जंगल वाचवण्यासाठी जगभरातून प्रार्थना केली जात आहे. अ‍ॅमेझॉनच्या जंगलात लागलेली आग विझवण्यासाठी  जी ७ देशांनी २० दक्षलक्ष युरोची मदत देण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र ब्राझीलनं ही मदत नाकारली आहे. ही मदत युरोपातील वर्षावनांसाठी  वापरावी असा टोलाही ब्राझीलनं लगावला आहे.

गेल्या काही दिवसांपासून आगीनं धुमसत असलेल्या अ‍ॅमेझॉनच्या जंगलाविषयी या गोष्टी माहितीये?

जी ७ देशांत फ्रान्स, ब्रिटन, कॅनडा, जपान, जर्मनी, इटली आणि अमेरिकेचा समावेश आहे.  फ्रान्सचे  अध्यक्ष इम्रन्युएल मॅक्रॉन यांनी अ‍ॅमेझॉनमध्ये लागलेल्या वणव्यांकडे सर्वांचं  लक्ष वेधलं होतं. अ‍ॅमेझॉनला पृथ्वीची फुफ्फुसं मानली जातात. इथे सतत लागणाऱ्या आगी हा चिंतेचा विषय आहे असंही त्यांनी सांगितलं. मॅक्रॉन यांनी अ‍ॅमेझॉनच्या जंगलातील आग विझवण्याचं आवाहनही देशांना केलं.

मुंबईतल्या गणेशोत्सवासही मंदीची झळ, प्रायोजकांच्या संख्येत घट

त्यानुसार  आग विझवण्यासाठी जी ७ देशांनी २० दक्षलक्ष युरोची मदत देण्याची तयारी दर्शवली. मात्र ब्राझीलनं ही मदत नाकारली आहे. फ्रान्सचे  अध्यक्ष इम्रन्युएल मॅक्रॉन यांनी त्यांचं घर आणि त्यांच्या वसाहतींची काळजी आधी करावी असाही टोला ब्राझीलनं लगावला आहे.