पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

TikTok साठी शुटिंग सुरू होते... गोळी उडाली... आणि तो रक्ताच्या थारोळ्यात पडला

टिकटॉक व्हिडिओ ऍप

उत्तर प्रदेशात बरैलीमध्ये एका १८ वर्षांच्या तरुणाने टिकटॉक व्हिडिओसाठी शुटिंग करताना चक्क आपल्या हातातील पिस्तूलमधून स्वतःवरच गोळी झाडल्याने त्याचा मृत्यू झाला. बरैलीतील हाफिजगंजमध्ये ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. केशव कुमार असे या घटनेत मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. तो बारावीत शिकत होता.

शिवसेनेऐवजी ठाकरेसेना नाव करा आणि बघा..., उदयनराजे कडाडले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी संध्याकाळी पाच वाजता ही घटना घडली. महाविद्यालयातून घरी आल्यावर केशवने आईकडे पिस्तूल मागितले. सुरुवातीला आईने पिस्तूल देण्यास नकार दिला. पण मुलगा खूपच मागे लागल्याने आईने त्याला पिस्तूल दिले. त्यानंतर आई स्वयंपाकघरात काम करीत असताना दुसऱ्या खोलीतून गोळी झाडल्याचा आवाज आल्याने आई पळत पळत त्या खोलीत गेली. आपला मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडला असल्याचे आईला दिसले. केशवला लगेचच बरैलीतील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. पण उपचारांपूर्वीच त्याला मृत घोषित करण्यात आले.

केशवचे वडील सैन्यात आहेत. टिकटॉक व्हिडिओसाठी खांद्यावर पिस्तुल घेतल्याचा व्हिडिओ तो शूट करीत होता. त्यावेळीच त्यातून गोळी चालविली गेली आणि ती लागल्याने केशवचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज आईच्या जबाबावरून पोलिसांनी व्यक्त केला. 

'राज्याचा खेळखंडोबा केलाय, हे दिवस बघण्यापेक्षा मेलेलं बरं'

केशवचे वडील वीरेंद्र सध्या रुरकीमध्ये कार्यरत आहेत. तो सातत्याने टिकटॉकसाठी व्हिडिओ करायचा आणि ते इतर सोशल मीडिया हँडल्सवरही टाकायचा, असे त्याच्या आईने सांगितले. केशवला प्रियांशी नावाची एक बहिणही आहे.