पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मगरीच्या जबड्यातून बहिणीला सोडवणाऱ्या भावाची चित्तथरारक सत्यकथा

मगर (संग्रहित छायाचित्र)

आपल्या लहाण बहिणीचा जीव वाचविण्यासाठी आणि तिला मगरीच्या जबड्यातून सोडवण्यासाठी भावाने केलेल्या प्रयत्नांमुळे तो हिरो ठरला आहे. या भावाचे वय १५ वर्षे आहे. पण अचानक उदभवलेल्या संकटात घाबरून किंवा डगमगून न जाता तो बहिणीला वाचविण्यासाठी खंबीरपणे उभा राहिला. हाशिम असे या भावाचे नाव आहे.

INDvsBAN: मयांकची शतकी खेळी अन् खास योगायोग!

डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, फिलिपाईन्समध्ये पालवानजवळील खाडीमध्ये ही घटना घडली. १२ वर्षांची हैना लिसा जोज हाबी खाडीजवळून जात होती. यावेळी तिचा भाऊही तिच्यासोबत होता. ते चालत असताना तिथेच दबा धरून बसलेल्या एका मगरीने हाबीचा पाय आपल्या जबड्याने पकडला. ती ओरडू लागल्यावर हाशिमला नेमकं काय घडलंय हे कळलं आणि तो मगरीच्या दिशेने आजूबाजूचे दगड फेकू लागला. त्यानंतर त्याने आपल्या बहिणीला धरले आणि मगरीच्या जबड्यातून बाहेर काढले.

मगरीच्या चाव्यामुळे हाबीच्या पायाला मोठी जखम झाली असली तरी ती आता पूर्णपणे बरी असून, तिला कोणताही धोका नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 

मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार: नवाब मलिक

ती मगर माझ्यापेक्षा खूप मोठी होती. तिला बघितल्यावर मी खूप घाबरले होते. तिचे दात आणि जबडाच मला दिसत होता. मी ओरडल्यानंतर हाशिमने मला मदत केली. त्याने दगडी मारण्यास सुरुवात केल्यामुळेच ती मगर घाबरली आणि तिने मला सोडले. माझ्या भावामुळेच माझे प्राण वाचले, असे हाबीने म्हटले आहे.