पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

इंग्लंडच्या पंतप्रधानपदी बोरिस जॉन्सन, बुधवारी औपचारिक पदग्रहण

बोरिस जॉन्सन

इंग्लंडमधील सत्ताधारी हुजूर पक्षाच्या नेतेपदी मंगळवारी बोरिस जॉन्सन यांची निवड झाली. त्यामुळे तेच इंग्लंडचे पुढचे पंतप्रधान असणार हे निश्चित झाले आहे. बुधवारी ते पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारतील. ब्रेक्झिटच्या मुद्द्यावरून थेरेसे मे यांनी पायउतार होण्याचे निश्चित केल्यानंतर इंग्लंडचा पुढील पंतप्रधान कोण असणार, याबद्दल उत्सुकता होती.

पंतप्रधानपदाच्या शर्यतीत दोन नावे होती. बोरिस जॉन्सन आणि जेरेमी हंट यांच्यामध्ये लढत झाली. त्यामध्ये पक्षाच्या बहुतांश सदस्यांनी बोरिस जॉन्सन यांच्यावरच विश्वास टाकला. 

खूशखबर!, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांनाही सातवा वेतन आयोग

थेरेसा मे आता बुधवारी इंग्लंडची महाराणी एलिझाबेथ यांच्यापुढे राजीनामा देऊन औपचारिकपणे पंतप्रधान पदावरून पायउतार होतील. त्यानंतर बोरिस जॉन्सन हे बकिंगहॅम पॅलेस येथे जाऊन पंतप्रधानपद स्वीकारतील. पंतप्रधानपदी विराजमान झाल्यावर ते देशवासियांना उद्देशून भाषण करतील.

थेरेसे मे यांच्या सरकारमध्ये बोरिस जॉन्सन हे मंत्री होते. पण थेरेसा मे यांनी घेतलेल्या निर्णयांचा विरोध म्हणून त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. आता तेच इंग्लंडच्या पंतप्रधानपदी येणार आहेत. या सगळ्या घडामोडींमुळे सत्ताधारी पक्षातील गट-तटाचे राजकारण आणखी वाढण्याची शक्यता आहे. पक्षातील सर्वांना एकत्र घेऊन पुढे जाणे आणि ब्रेक्झिटचा विषय मार्गी लावणे ही दोन मोठी कामे बोरिस जॉ़न्सन यांच्यापुढे असणार आहे.