पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ब्रिटनमध्ये 'फिर एक बार बोरिस सरकार', ब्रेक्झिटचा मार्ग सुकर

बोरिस जॉन्सन

ब्रिटनमध्ये सार्वत्रिक निवडणुकीत काँझर्व्हेटिव्ह पक्षाने शानदार विजय मिळवत बहुमताचा जादुई ३२६ हा आकडा पार केला आहे. १९८० च्या दशकात मार्गारेट थॅचर यांच्या काळानंतर काँझर्व्हेटिव्ह पक्षाचा हा सर्वांत मोठा विजय मानला जात आहे. हाऊस ऑफ कॉमन्समधील एकूण ६५० पैकी ६४७ जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. यामध्ये बोरिस जॉन्सन यांच्या काँझर्व्हेटिव्ह पक्षाने ३६२ जागांवर विजय मिळवला तर लेबर पक्षाच्या खात्यात २०३ जागा आल्या आहेत. 

राहुल गांधींच्या 'रेप इन इंडिया' कमेंटवरून संसदेत गदारोळ, भाजप आक्रमक

प्रमुख विरोधी लेबर पक्षाचे नेते जेरेमी कॉर्बिन यांनी पराभव स्वीकारताना पुढील निवडणुकीत पक्षाचे नेतृत्व करणार नसल्याचे जाहीर केले आहे. लेबर पक्ष १९३५ नंतर आतापर्यंतच्या सर्वांत दारुण पराभवाकडे वाटचाल करत आहे. दुसरीकडे काँझर्व्हेटिव्ह पक्षाने १९८७ नंतरच्या सर्वांत मोठ्या विजयाकडे मार्गक्रमण करत आहे. २०१७ च्या मागील निवडणुकीत काँझर्व्हेटिव्हला ३१८ जागांवर विजय मिळाला होता. तर लेबर पार्टीला २६२ जागा मिळाल्या होत्या.

माफी मागणार नाही, राहुल गांधी आपल्या कमेंटवर ठाम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोरिस जॉन्सन यांना विजयानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी प्रचंड बहुमताने सत्तेत पुनरागमन केल्यानिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा. माझ्या त्यांना शुभेच्छा. भविष्यात भारत-ब्रिटनच्या नात्यासंबंधी एकत्रित काम करण्याची अपेक्षा करतो, असे टि्वट त्यांनी केले. 

या निवडणूक निकालांनी फक्त बोरिस जॉन्सन यांचे सत्तेत येणे निश्चित झाले नसून यूरोपीयन यूनियनमधून ब्रिटन बाहेर पडणे म्हणजेच ब्रेक्झिटचा मार्ग सुलभ केला आहे. जॉन्सन यांच्या मागील मंत्रिमंडळात वरिष्ठ मंत्री राहिलेले भारतीय वंशाच्या प्रीती पटेल म्हणाल्या की, ब्रेक्झिट ही आमची प्राथमिकता आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रतिबद्ध आहोत. समझोता तयार आहे आणि आम्ही पुढे जाऊ इच्छितो.

कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा: अनिल गोटे