पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दिल्ली हिंसाचारः जवानाचं जळलेलं घर उभारण्यासाठी BSFचा पुढाकार

जवानाचं जळलेलं घर उभारण्यासाठी BSFचा पुढाकार

दिल्लीतील दंगलखोरांनी केवळ लोकांचा जीव घेतला नाही तर शेकडो लोकांच्या स्वप्नांचा चुराडाही केला आहे. दंगेखोरांनी खजुरी खास परिसरातील सीमा सुरक्षा दलाचा (बीएसएफ) जवान मोहम्मद अनीसचे घर जाळले होते. तीन महिन्यांनंतर अनीसचे लग्न होणार होते. अनीसने या घटनेची माहिती आपल्या वरिष्ठांना दिली नव्हती. परंतु, बातम्यांच्या माध्यमातून हे वृ्त वरिष्ठांपर्यंत पोहोचले आणि आता बीएसएफने आपल्या जवानाचे घर पुन्हा उभारण्यासाठी मदत सुरु केली आहे. बीएसएफच्या महासंचालकांनी आपल्या जवानाचे घर पुन्हा उभारण्यासाठी प्रयत्नात कसूर ठेवणार नसल्याचे सांगितले आहे. 

'...पण तेच लोक अयोध्येतील राम जन्माचा पुरावा मागत आहेत'

अनीसचे घर जळाल्याचे माहिती प्रसारमाध्यमांमार्फत बीएसएफला मिळाली. त्यानंतर त्वरीत बीएसएफने आपल्या जवानाच्या कुटुंबीयांना मदतीचा प्रस्ताव दिला. 

अनीसचे वडील मोहम्मद मुनिस (५५), काका मोहम्मद अहमद (५९) आणि १८ वर्षीय बहिण नेहा परवीन हे त्या घरात राहतात. दंगलीवेळी सर्वजण घरातच होते. मोठ्या मुश्किलीने त्यांना तेथून पळून जाता आले. त्यामुळे त्यांचा जीव बचावला. हे सर्वजण आपल्या नातेवाईकांकडे गेले होते. त्यानंतर २५ फेब्रुवारीला सुरक्षादलांकडून त्यांना मदत मिळाली. 

मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी परमबीर सिंह यांची नियुक्ती

बीएसएफचे महासंचालक विवेक जोहरी म्हणाले की, आम्ही पीडित जवानाला आर्थिक मदत करु आणि त्याचे घर उभारण्यासाठी सहाय करणार आहोत. अभियांत्रिकी विभागाचे एक पथक जवानाच्या घराची पाहणी करत आहे. अनीसला बीएसएफ वेल्फेअर फंडातून १० लाखांचा धनादेश दिला जाईल. तीन महिन्यांनंतर त्याचे लग्न होणार होते. त्याच्या लग्नाची आमच्याकडून ही भेट असेल. 

'गो-एअर'च्या विमानात कबुतर, प्रवाशांचा उडाला गोंधळ

अनीस २०१३ मध्ये बीएसएफमध्ये दाखल झाला होता. सुमारे ३ वर्षे तो जम्मू-काश्मीरमध्ये कार्यरत होता. सध्या तो ओडिशात कार्यरत असून लवकरच त्याची दिल्लीला बदली होणार असल्याचे बीएसएफचे अधिकारी पुष्पेंद्र राठोड यांनी सांगितले.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Border Security Force helps BSF constable Mohammad Anees whose house in Khajuri Khas area was set on fire during Delhi Violence