पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बांगलादेशच्या सैनिकांनी केलेल्या गोळीबारात बीएसएफचा जवान शहीद

BSF

भारत-बांगलादेश सीमेवर बांगलादेशच्या सैनिकांनी केलेल्या गोळीबारात बीएसएफचा एक जवान शहीद झाला आहे. तर एक जवान गंभीर जखमी झाला आहे. जखमी जवानावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

'शिवाजी महाराजांचे संस्कार आमच्यासोबत होते आता परिवारही आहे'

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी भारत-बांगलादेश सीमेवर भारतातील तीन मच्छिमार मासेमारी करण्यासाठी पद्मा नदीमध्ये गेले होते. या तिन्ही मच्छिमारांना बांगलादेशच्या सैनिकांनी ताब्यात घेतले. काही वेळात यातील दोघांची सुटका केली तर एकाला सोडलेच नाही. सुटका झालेल्या मच्छिमारांनी ताबडतोब ककमारीचार बीएसएफ पोस्टमध्ये धाव घेत घडलेला प्रकार सांगितला.

काँग्रेस-राष्ट्रवादीने लोकांना गाळात घातले, उदयनराजे कडाडले

तसंच, बीएसएफच्या पोस्ट कमांडरला फ्लॅग मिटिंगसाठी बोलवून आणा असे बांगलादेशी सैन्यांनी सांगितले असल्याचे मच्छिमारांनी बीएसएफच्या जवानांना सांगितले. त्यानंतर बीएसएफचे जवान मच्छिमारांच्या शोधासाठी गेले असता बांगलादेशी सैनिकांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारामध्ये बीएसएफचे हेड कॉन्स्टेबल विजय भान सिंग यांच्या डोक्याला गोळी लागली. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. तर आणखी एका जवानाच्या हाताला गोळी लागली. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

मुंबईत आठवड्या अखेरीस मान्सूनोत्तर सरी