पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अभिनेता हृतिक रोशनचे आजोबा आणि प्रसिद्ध दिग्दर्शक जे. ओम प्रकाश यांचे निधन

हृतिक रोशन

अभिनेता हृतिक रोशन याचे आजोबा आणि बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक जे. ओम प्रकाश यांचे बुधवारी सकाळी निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते.  राजेश खन्ना यांच्या  'आपकी कसम', 'आखिर क्यों', जितेंद्र यांच्या 'अर्पण' आणि 'आदमी खिलोना हैं ' यांसारख्या  यशस्वी चित्रपटांचं दिग्दर्शन जे. ओम प्रकाश यांनी केलं आहे. 

सुषमा स्वराज यांच्या निधनानं मराठी चित्रपटसृष्टीतही हळहळ
 

सेटवर येऊन दिले होते आशीर्वाद, रितेशनं सांगितली सुषमा स्वराज यांची आठवण

ओमप्रकाश यांनी 'आस का पंछी', 'आये दिन बाहार के' यांसारख्या हिट चित्रपटांची निर्मितीही केली आहे. 'आंधी' या चित्रपटाची  निर्मितीदेखील जे. ओम प्रकाश यांनीच केली होती. हृतिकच्या आईचे ते वडील होते. ८० च्या दशकात त्यांनी आपल्या दिग्दर्शन कौशल्यानं अनेक सुपरहिट चित्रपट दिले. 'आंधी' या चित्रपटाची  निर्मितीदेखील जे. ओम प्रकाश यांनीच केली होती. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Bollywood filmmaker and Hrithik Roshan maternal grandfather J Om Prakash died on Wednesday morning