पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

स्वरा म्हणते, या सरकारवर भरवसाच नाय!

स्वरा भास्कर

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने लखनऊमधील हिंदुस्थान शिखर संमेलनात केंद्र सरकारवर निशाना साधला आहे. या सरकारवर मला भरवसा नाही, असे तिने म्हटले आहे. सुधारित नागरिकत्व कायदा, राष्ट्रीय नागरिकत्व आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी या मुद्यांसह सरकारच्या अन्य धोरणाबाबत स्वराने प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले.  

चलो अयोध्या! उद्धव ठाकरे ७ मार्चला घेणार श्रीरामाचे दर्शन

स्वरा भास्कर म्हणाली की, मला सरकारच्या कामावर आणि त्यांच्या कृत्यावर अजिबात विश्वास नाही. सीएए, एनआरसी आणि एनपीआर याच्या माध्यमातून भाजप मतांच्या ध्रुवीकरणाचे राजकारण करत आहे, असा आरोपही स्वराने केला आहे. राष्ट्रवादी असणे गुन्हा नाही पण राष्ट्राच्या नावाखाली हत्याऱ्याला सोडून देणे हा गुन्हा आहे. सीएएला एनपीआर आणि एनआरसीपासून वेगळे करुन पाहता येणार नाही. त्यामुळेच सीएएविरोधात आंदोलने सुरु आहेत, असेही ती म्हणाली.  

मेलेनिया ट्रम्प यांच्या कार्यक्रमातून केजरीवाल-सिसोदियांना वगळले

आपल्याला नेमकं काय करायचे आहे हेच सरकारला माहित नाही. एनआरसीचा मुद्दा सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी समजून घ्यावा. एनआरसीमधील तरतूदी या भीतीदायक आहेत, असेही स्वरा यावेळी म्हणाली. ज्यावेळी एनआरसीचा आराखडा तुमच्याकडे आहे का? असा प्रश्नही स्वराला करण्यात आला होता. यावर हे काम माझे नाही, असे उत्तर तिने दिल्याचे पाहायला मिळाले.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:bollywood actress swara bhaskar attacks government over caa nrc and npr in hindustan shikhar samagam