पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अमेरिकेत विमान नदीत कोसळले, सर्व १३६ प्रवासी सुखरुप

अमेरिकेतील फ्लोरिडा येथे १३६ प्रवासी असलेले विमान थेट नदीत कोसळले.

अमेरिकेतील फ्लोरिडा येथे १३६ प्रवासी असलेले विमान थेट नदीत कोसळले. विशेष म्हणजे, विमानातील सर्व प्रवासी हे सुखरुप आहेत. फ्लोरिडातील जॅक्सनविले येथे हा अपघात झाला.

या विमानात १४३ जण होते. यात १३६ प्रवासी आणि ७ क्रू सदस्यांचा समावेश होता. जॅक्सनविले येथील नौदलाच्या विमानतळावरुन विमानाने उड्डाण केले आणि ते थेट सेंट जॉन्स नदीत जाऊन कोसळले. हे एक व्यावसायिक विमान होते. 

सुदैवाने नदीत खोल पाणी नसल्यामुळे विमान कोसळून ही ते बुडाले नाही. त्यामुळे मोठी जिवीतहानी टळली. विमानातील सर्व प्रवासी सुखरुप आहेत. प्रवाशांना वाचवण्यासाठी जेएसओ मरीन यूनिटला बोलावण्यात आले आहे.

जॅक्सनविलेच्या महापौरांनी टि्वट करुन याची माहिती दिली. आमचे एक व्यावसायिक विमान नदीत कोसळले आहे. आम्ही मदत पथकाला याची माहिती दिली आहे. त्यांनी मदत कार्य सुरु केले आहे. सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. 
 
अपघातग्रस्त विमान मायामी एअर इंटरनॅशनलचे असल्याची प्राथमिक माहिती आहे. या कंपनीच्या ताफ्यात बोईंग ७३७-८०० ही विमाने आहेत.