पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'कॅफे कॉफी डे'चे संस्थापक सिद्धार्थ यांचा मृतदेह सापडला

व्ही जी सिद्धार्थ

'कॅफे कॉफी डे'चे संस्थापक आणि माजी केंद्रीय मंत्री एस एम कृष्णा यांचे जावई व्ही जी सिद्धार्थ यांचा मृतदेह बुधवारी सकाळी नेत्रावती नदीच्या पात्रात सापडला. मंगळुरूमध्ये होयगे बाजारजवळ हा मृतदेह सापडला. दरम्यान, ज्या ठिकाणाहून ते बेपत्ता झाले आहेत. तिथे एका मच्छिमाराने एका व्यक्तीला नेत्रावती नदीत उडी मारताना पाहिल्याची माहिती समोर आली आहे. 

ऐतिहासिक निर्णय : तिहेरी तलाक विरोधी विधेयक राज्यसभेत मंजूर

मंगळुरूचे सहायक पोलिस आयुक्त कोदांदरम यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, सायमंड डिसुझा नावाच्या मच्छिमाराने एका व्यक्तीला नदीत उडी मारताना पाहिले. आम्ही त्यांचा जबाब नोंदवून घेतला आहे. ते नदीमध्ये मासेमारी करीत असतानाच एका व्यक्तीने नदीत उडी मारल्याचे त्यांनी पाहिल्याचे सांगितले.
सिद्धार्थ हे सोमवारी संध्याकाळपासून बेपत्ता होते. नेत्रावती नदीवरील उल्लाल ते मंगळुरू यांना जोडणाऱ्या पुलावर ते शेवटचे दिसले होते, अशी माहिती त्यांचा वाहनचालक बसवराज पाटील यांनी पोलिसांना दिली होती.

सायमंड डिसुझा यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, पाण्यात उडी मारल्यामुळे झालेला आवाज मी ऐकला. त्यानंतर मी लगेच मागे वळून पाहिले. एक व्यक्ती स्वतःला वाचविण्याचा प्रयत्न करीत होती. पण मी तिथे पोहोचेपर्यंत ती बुडाली होती. नदीच्या पाण्याला वेग होता आणि जिथे ती व्यक्ती बुडाली तिथे खूप खोली होती. त्यामुळे मी त्यांना शोधू शकलो नाही. 

अखेर बुधवारी त्यांचा मृतदेह शोध पथकाला सापडला.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Body of VG Siddhartha founder of Cafe Coffee Day has been found on the banks of Netravati River