पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बिहारच्या महानंदा नदीत बोट उलटली; ४ जणांचा मृत्यू

बिहारमध्ये बोट उलटली

बिहारमध्ये महानंदा नदीमध्ये बोट उलटल्याची घटना घडली आहे. आबादपूर येथील जगरन्नाथपूर येथे ही घटना घडली आहे. गुरुवारी संध्याकाळी प्रवाशांना घेऊन जाणारी बोट अचानक उलटली. या बोटीमध्ये ५० ते ७० प्रवासी होते. बोट उलटल्यानंतर २८ जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. अनेक जण बेपत्ता झाले असून ४ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. यामधील एका मृतदेहाची ओळख पटली आहे तर इतर तीन मृतदेहांची ओळख पटली नाही.

भाजपची चौथी यादी जाहीर; विनोद तावडे, राज पुरोहित यांना धक्का

मिळालेल्या माहितीनुसार, महानंदा नदीमध्ये बोटींच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा संपल्यानंतर सर्व जण दुसऱ्या बोटीने घरी जात होते. त्यावेळी ही दुर्घटना घडली. एनडीआरएफच्या टीमने घटनास्थळी धाव घेत २८ जणांचे प्राण वाचवले. बोटीतून प्रवास करणारे सर्व जण पश्चिम बंगालच्या मालदा येथून बिहारच्या कटिहार येथे जात होते. याच दरम्यान बोट उलटली. दुर्घटनेमध्ये मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. 

राज्यात गुरुवारी १४२३ उमेदवारी अर्ज दाखल