पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

माथेफिरू तरूणाकडून प्रेयसीची हत्या, नंतर स्वतः केली आत्महत्या

घटनास्थळाचे छायाचित्र

उत्तर प्रदेशात लखीमपूरमध्ये एका माथेफिरू तरुणाने त्याच्या प्रेयसीची गोळ्या घालून हत्या केली. त्यानंतर या तरुणाने स्वतःवरही गोळ्या झाडून आत्महत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली. सतीश असे या तरुणाचे नाव आहे.

नितेश राणेंनी भाजपमध्ये केला प्रवेश; उमेदवारीवर झाले शिक्कामोर्तब

सतीश याचे संगीता नावाच्या महिलेवर प्रेम होते. त्यामुळे संगीता आपल्या पहिल्या पतीला सोडून सतीशसोबत आली होती. शहरातील गोला रोड भागात संगीता एक दुकान चालवायची. गुरुवारी दुपारी १२ वाजता सतीश संगीताच्या दुकानावर गेला. तिथे त्या दोघांमध्ये वादावादी झाली. त्यानंतर सतीशने त्याच्याकडील गावठी कट्ट्यातून संगीतावर गोळ्या झाडल्या. 

NCPच्या दुसऱ्या यादीत पंकज भुजबळ, बबनदादा शिंदेंसह २० जणांना संधी

सतीशने झाडलेल्या गोळ्या संगीताच्या पोटावर लागल्या आणि ती खाली कोसळली. शहरातील लोकांसमोर भरदिवसा ही घटना घडल्यामुळे एकदम खळबळ उडाली. यानंतर सतीशने स्वतःच्या डोक्यावर गोळ्या झाडल्या. दोघांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले असून, शवविच्छेदनासाठी पाठवून दिले आहेत. नेमके कशामुळे सतीशने गोळीबार केला, हे अद्याप उघड झालेले नाही.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:bloody game played in love lover shot girlfriend dead in the middle market also shot himself