पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

स्विस बँकेत भारतीयांचे ७००० कोटी रुपये

स्विस बँक

भारतीयांनी १९८० ते २०१० या कालावधीत २१६.४८ अब्ज डॉलर ते ४९० डॉलरपर्यंत काळा पैसा हा देशाबाहेर नेला आहे. आर्थिक प्रकरणातील तीन प्रतिष्ठित संस्थांनी आपल्या अहवालाच्या आधारे ही माहिती दिली आहे. समितीने हा अहवाल संसदेसमोर ठेवला आहे. 

स्विस बँक खातेधारकांची नावे उघड करु शकत नाही : अर्थमंत्रालय

या तीन संस्थांनी केला अभ्यास
काळ्या पैशावरील राजकीय वादादरम्यान मार्च २०११ मध्ये तत्कालीन सरकारने तीन संस्थांना देश आणि देशाबाहेरील भारतीयांच्या काळ्या पैशाचा अभ्यास करण्याचा जबाबदारी दिली होती. 

या तीन संस्थांमध्ये राष्ट्रीय लोक वित्त आणि निती संस्था (एनआयपीएफपी), राष्ट्रीय व्यावहारिक आर्थिक शोध परिषद (एनसीएईआर) आणि राष्ट्रीय वित्तीय प्रबंध संस्था (एनआयएफएम) यांचा समावेश आहे. 

काँग्रेसचे वीरप्पा मोईली यांच्या अध्यक्षतेखालील समितीने १६ वी लोकसभा भंग होण्यापूर्वी २८ मार्च रोजी लोकसभा अध्यक्षांना आपला अहवाल सोपवला होता.

भेटवस्तू पाठवेन पण मत देणार नाही, ममतांचे मोदींना उत्तर

प्राथमिक अहवाल

समितीने म्हटले आहे की, या विषयाशी संबंधित सर्व पक्षांमधील काहींशी चर्चा करण्यात आली. कारण आमच्याकडे वेळेचा अभाव होता. त्यामुळे या संदर्भात बिगर सरकारी साक्षीदार आणि तज्ज्ञांशी चर्चा करण्याची कसरत पूर्ण करण्यापर्यंत या समितीचा अहवाल प्राथमिक स्वरुपात घेता येऊ शकतो.

हा उपाय सुचवला
समितीने म्हटले आहे की, ते अर्थ मंत्रालयाच्या महसूल विभागाकडून काळा पैसा शोधून काढण्यासाठी अधिक ताकदीने प्रयत्न करतील. या समित्यांनी सादर केलेल्या अहवालावर पुढील कारवाई होईल. त्याचबरोबर बहुप्रतिक्षित प्रत्यक्ष कर संहिता त्वरीत तयार करुन ती संसदेत ठेवली जावी. त्यामुळे प्रत्यक्ष कर कायद्याला सुलभ आणि तर्कसंगत बनवता येईल.

काळा पैसा
- स्विस बँकेत २०१८ च्या आकडेवारीनुसार भारतीयांचे ७००० कोटी रुपये जमा. तर विदेशी नागरिकांचे १०० लाख कोटी स्विस बँकेत जमा आहेत.

काळा पैसा बाहेर पाठवणारे आघाडीच्या पहिल्या पाच देशांत भारत
१. चीन
२. रशिया
३. मेक्सिको
४. भारत
५. मलेशिया

०१ खर्व डॉलर काळा पैसा विकसनशील देशांमधून बाहेर जाते. ८६ मोठ्या कंपन्यांच्या फायद्याइतका हा काळा पैसा आहे.