पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जेटलींच्या जागेवरुन सुधांशु त्रिवेदी राज्यसभेवर बिनविरोध

सुधांशु त्रिवेदी

माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्या निधनानंतर रिकाम्या झालेल्या राज्यसभेच्या जागेवर भाजप उमेदवार सुधांशु त्रिवेदी हे निवडून गेले आहेत. राज्यसभेच्या जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत ते बिनविरोध निवडून गेले. उत्तर प्रदेश मंत्रिमंडळातील सदस्यांच्या उपस्थितीत त्रिवेदी यांना प्रमाणपत्र देण्यात आले.

... असे असणार राष्ट्रपती, पंतप्रधानांचे नवे 'एअर फोर्स वन' विमान, काही खास सुविधा

त्रिवेदी हे दीर्घकाळापासून पक्षाचे प्रवक्ते म्हणून काम पाहत होते. भाजपचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत वाजपेयी आणि माजी केंद्रीय मंत्री मनोज सिन्हा यांच्या नावांची चर्चा या जागेसाठी सुरु होती. पण यात त्रिवेदी भारी पडले. राजनाथ सिंह जेव्हा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. तेव्हा त्रिवेदी हे त्यांच्या नजीक गेले होते. राजनाथ सिंह पक्षाध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी सल्लागार म्हणून काम केले होते.

राफेलची पूजा केल्यानंतरही काँग्रेसला वाईट वाटलेः अमित शहा

सुधांशु त्रिवेदी यांनी नंतर भाजप अध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही प्रभावित केले. लखनौ येथून सुधांशु यांनी मॅकेनिकल इंजिनिअरिंगमध्ये पीएच.डी घेतल्यानंतर अनेक विद्यापीठांमध्ये अध्यापनाचे काम केले. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचे सल्लागार आणि राजनाथ सिंह हे पक्षाचे अध्यक्ष असताना राजकीय सल्लागार राहिलेले सुधांशु त्रिवेदी २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीवेळीही तिकिटाचे दावेदार होते. राज्यसभेसाठीही त्यांच्या नावाची अनेक वेळा चर्चा होत असत. परंतु, त्यांना तिकीट मिळाले नव्हते. 

पाकिस्तानी आहात का?, भरसभेत भाजपच्या उमेदवाराने उपस्थितांना विचारला प्रश्न

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:BJPs Sudhanshu Trivedi elected unopposed To Rajya Sabha In By Election From Uttar Pradesh