पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मिशन साऊथ!, २०२४च्या निवडणुकीत भाजपचे लक्ष्य ३३३ जागा

अमित शहा आणि नरेंद्र मोदी

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने घवघवीत यश मिळवले. भाजपने जरी निवडणूक पूर्व विविध मित्रपक्षांशी युती केली असली, तर लोकसभेत भाजप स्वबळावर बहुमतात आहे. ३०३ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. पण यावर शांत राहण्यास पक्ष तयार नाही. पुढच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने लोकसभेत ३३३ जागांचे लक्ष्य ठेवले आहे. यासाठी दक्षिणेकडील राज्यांमध्ये आता अधिक लक्ष घातले जाईल, असे पक्षाचे सरचिटणीस तसेच आंध्र प्रदेश आणि त्रिपुराचे प्रभारी सुनील देवधर यांनी 'हिंदूस्थान टाइम्स'ला सांगितले. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने स्वबळावर २८२ जागा जिंकल्या होत्या. त्या यंदा वाढून ३०३ पर्यंत जाऊन पोहोचल्या आहेत.

१७ व्या लोकसभेचे पहिले सत्र ६ जूनला सुरु होण्याची शक्यता

पश्चिम बंगाल ते तामिळनाडू या राज्यांपर्यंत भाजपचा विस्तार हे २०२४ साठी आमचे लक्ष्य आहे. जर आम्हाला ३३३ जागांपर्यंत पोहोचायचे असेल, तर आम्हाला या राज्यांवर जास्त लक्ष द्यावे लागेल, असे त्यांनी म्हटले आहे. सुनील देवधर यांची त्रिपुरातील विजयामध्ये मोठी भूमिका होता. ते म्हणाले, भाजप हा केवळ हिंदी भाषिक राज्यातील पक्ष आहे ही दक्षिणेतील लोकांमध्ये असलेली धारणा दूर करण्यात पक्ष यशस्वी ठरला, तरच ३३३ जागांचा पल्ला गाठणे शक्य होईल. या मोहिमेसाठीच मी तेलगू शिकण्यास सुरुवात केली आहे. माझ्याकडे पूर्वेकडील राज्यांची जबाबदारी सोपविण्यात आल्यावर मी बंगालीसुद्धा शिकलो, असे त्यांनी स्पष्ट केले.

जर तुम्हाला लोकांच्या मनात स्थान मिळवायचे असेल, तर तुम्हाला स्थानिक भाषा आलीच पाहिजे, असे सुनील देवधर यांनी सांगितले. दरम्यान, भाजप हा केवळ हिंदी भाषिक राज्यातील पक्ष नाही. तर संपूर्ण देशव्यापी पक्ष आहे. हे समाजमनात ठसविण्यासाठी पुढील काळात प्रयत्न करण्यात येणार आहेत, असे पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यासाठी दक्षिणेकडील तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांमध्ये पक्षविस्तार करण्यासाठी पक्षसंघटनेत आवश्यक बदलही करण्यात येतील, असे स्पष्ट करण्यात आले. 

लोकांना घराणेशाही नको आहे, तेजस्वी यादव यांच्या राजीनाम्याची मागणी

नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपने कर्नाटकमध्ये २८ पैकी २५ जागा जिंकल्या. तेलंगणामध्ये १७ पैकी ४ जागांवर भाजपचे उमेदवार यशस्वी ठरले. पण तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये भाजपला एकही जागा मिळाली नाही. पश्चिम बंगालमध्ये ज्या पद्धतीने भाजपने आपल्या जागा या निवडणुकीत २ वरून १८ पर्यंत वाढविल्या. त्याप्रमाणे दक्षिणेकडील राज्यात निकाल आणण्यासाठी आता प्रयत्न सुरू करण्यात येणार आहेत.