पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

एक व्हिडिओ शेअर करून राहुल गांधींची सत्ताधाऱ्यांवर उपरोधिक टीका

राहुल गांधी

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी हरियाणा विधानसभा निवडणुकीतील एका मतदारसंघातील भाजपच्या उमेदवाराच्या व्हायरल व्हिडिओवरून सत्ताधारी पक्षावर उपरोधिकपणे टीका केली. ईव्हीएमवर तुम्ही कोणतेही बटण दाबा मत सत्ताधारी पक्षालाच (भाजप) जाईल, असे कथित वक्तव्य भाजपचे उमेदवार बक्षिससिंग विर्क करीत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हाच व्हिडिओ स्वतःच्या ट्विटर हँडलवरून शेअर करून राहुल गांधी यांनी विर्क यांना भाजपमधील सर्वांत प्रामाणिक माणूस म्हटले आहे. 

करमाळा मतदारसंघातील मतदान केंद्रावर दोन गटांत हाणामारी

महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन्ही विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी मतदान सुरू आहे. त्यावेळी राहुल गांधी यांनी हा व्हिडिओ शेअर केला. दरम्यान, खुद्द विर्क यांनी सोशल मीडियावर व्हायरल झालेला तो व्हिडिओ बनावट असल्याचे म्हटले आहे. आपण असे वक्तव्य केले नसून, विरोधकांनी संबंधित व्हिडिओ एडिट केला आहे. आपल्याला बदनाम करण्याचा हा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

लवकर मतदानाला चला... आता वाजले की १२!

या व्हिडिओवरून निवडणूक आयोगानेही विर्क यांना नोटीस बजावली आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर निवडणूक आयोगाने माजी निवडणूक उपायुक्त विनोद झुत्शी यांना कर्नालमधील असांध विधानसभा मतदारसंघात पाठवले आहे. मतदारसंघातील मतदारांमध्ये ईव्हीएमबद्दल विश्वास निर्माण होईल, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश विनोद झुत्शी यांना देण्यात आले असल्याचे आयोगाने म्हटले आहे.