पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दिल्ली निवडणुकीत भाजपने तयार केले डीपफेक व्हिडिओ, प्रचारात नवे आव्हान

भाजप

दिल्लीत नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये दिल्ली भाजपकडून डीपफेक तंत्रज्ञानाचा वापर करून काही व्हिडिओ अंतर्गत रचनेत प्रसारित करण्यात आल्याची माहिती एका अहवालातून पुढे आली आहे. डीपफेक व्हिडिओचे नवे आव्हान पुढील काळात देशातील निवडणूक प्रचारात असणार आहे, हे सुद्धा या अहवालात नमूद केले आहे. दरम्यान, या अहवालात हे व्हिडिओ तयार करताना दिल्ली भाजपकडून कोणताही गैरप्रकार झालेला नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले. पण हे तंत्रज्ञान निश्चितच भविष्यात आव्हान निर्माण करणार असल्याचे म्हटले आहे.

दिशा कायद्याची माहिती घेण्यासाठी गृहमंत्री आंध्रप्रदेश दौऱ्यावर

व्हाईसने (Vice) हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार, दिल्ली भाजपकडून एका कंपनीशी करार करण्यात आला होता. या कंपनीने डीपफेक तंत्रज्ञान वापरून पक्षाचे नेते आणि खासदार मनोज तिवारी यांचे दोन व्हिडिओ तयार केले. या व्हिडिओमध्ये मनोज तिवारी हरयाणवी आणि इंग्रजीमध्ये बोलताना दिसतात. मनोज तिवारी यांच्या हिंदीतील भाषणांवरूनच हे व्हिडिओ तयार करण्यात आले. हे व्हिडिओ इतके सफाईदारपणे तयार करण्यात आले की मनोज तिवारी हरयाणवी आणि इंग्रजीमध्ये व्यवस्थित बोलत आहेत असे वाटते. पण ते डीपफेक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आल्याचे व्हाईसने म्हटले आहे.

एक्स्प्रेस वेवर विचित्र अपघात, शेतकऱ्याला १० ते १५ गाड्यांनी उडविले

दिल्ली भाजपच्या एका नेत्याने सांगितले की, कंपनीने अशा स्वरुपाचा कोणताही करार कोणत्याही कंपनीशी केला नव्हता. आमच्याकडे वेगवेगळ्या कंपन्या आल्या आणि त्यांनी त्यांची प्रचारासंदर्भातील विविध उत्पादने दाखविली. त्यावेळी आमच्या टीममधील एका सदस्याकडे एक व्हिडिओ आला होता. त्यामध्ये मनोज तिवारी हरयाणवी भाषेत भाषण देत असल्याचे दाखवले होते. आमच्यापैकी काहींना असे वाटले की हा व्हिडिओ इंग्रजीतही असायला हवा. त्यामुळे आम्ही इंग्रजीतील व्हिडिओची मागणी एका कंपनीकडे केली. त्या कंपनीने आम्हाला तो व्हिडिओ त्या पद्धतीने तयार करून दिला. हे तंत्रज्ञान सकारात्मकपण वापरले तर त्याचा खूप चांगला उपयोग होऊ शकतो, असेही या नेत्याने सांगितले.

डीपफेक व्हिडिओ म्हणजे काय?
डीपफेक हे एक तंत्रज्ञान आहे. या माध्यमातून ऑडिओ आणि व्हिडिओ तयार करता येतात. कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) वापरून हे व्हिडिओ तयार केले जातात. हे व्हिडिओ पू्र्णपणे कल्पनारम्य स्वरुपाचे असतात. पण त्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीचे वेगळ्या पद्धतीने चित्रण दाखवता येऊ शकते. त्या व्यक्तीने कधीच न बोललेले शब्द किंवा वाक्य या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्याच्या तोंडी दाखवता येऊ शकतात. सामान्य प्रेक्षकांसाठी किंवा श्रोत्यांना डीपफेक व्हिडिओ ओळखणे अवघड असते.