पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्याचा खून, तीन दिवसात दोघांची हत्या

२४ परगणा येथे भाजप कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली (ANI)

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर देशातील काही भागांमध्ये हिंसाचार झाल्याचे वृत्त गेल्या दोन दिवसांपासून येत आहे. उत्तर प्रदेशमधील गाझीपूरनंतर अमेठीतील स्मृती इराणींच्या एका निकटवर्तीयाची हत्या करण्यात आली होती. आता पश्चिम बंगालमध्येही हे सत्र सुरु झाले आहे. बंगालमधील २४ परगणा येते भाजपच्या एका कार्यकर्त्याची अज्ञात लोकांनी गोळ्या झाडून हत्या केली आहे. या घटनेनंतर २४ परगणा येथे तणावाचे वातावरण आहे. 

अमेठीत स्मृती इराणींच्या निकटवर्तीय भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या

२४ परगणा येथील घटनेप्रकरणी भाजपने टीएमसीवर आरोप केले आहेत. परंतु, पोलिसांनी सुरुवातीच्या तपासावरुन या हत्येमागे राजकीय संघर्ष नसल्याचे म्हटले आहे. ही हत्या भाटापोरा येते रविवारी रात्री झाली. चंदन शॉ असे मृत भाजप कार्यकर्त्याचे नाव आहे. अज्ञात लोकांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. 

स्मृती इराणींनी दिला सुरेंद्र सिंह यांच्या पार्थिवाला खांदा

घटनेनंतर परिसरातील तणाव पाहता पोलिसांनी मोठा फौजफाटा तिथे तैनात केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला आहे. तीन दिवसात दोन हत्या झाल्यामुळे तणाव निर्माण झाला आहे.