पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मोदींना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्याची गुजरात ते दिल्ली सायकलवारी

मोदींना शुभेच्छा देण्यासाठी गुजरातचा कार्यकर्ता सायकलवरवरुन दिल्लीत (ANI)

लोकसभा निवडणुकीत भाजपला ३०० हून अधिक जागांवर विजय मिळाल्यानंतर भाजपचा एक कार्यकर्ता गुजरातहून सायकलवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना शुभेच्छा देण्यासाठी दिल्लीला आला आहे. 

आमदाराच्या 'बॅटिंग'वर मोदी नाराज; म्हणाले, अशांना पक्षात स्थान नाही

एएनआयशी बोलताना भाजप कार्यकर्ते खिमचंद चंद्रानी म्हणाले की, जर भाजपने ३०० हून अधिक जागा जिंकल्या जर शुभेच्छा देण्यासाठी मी सायकलने दिल्लीला जाईल, असा संकल्प केला होता. मला हे अंतर कापण्यासाठी एकून १७ दिवस लागले. मी पंतप्रधान मोदींशी बोललो. त्यांनी मला तुमच्याकडे मोठी हिंमत असल्याचे म्हटले. मी उद्या अमित शहांची भेट घेईल. 

दरम्यान, भाजपने ३०३ जागा जिंकल्या आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपेक्षाही भाजपने मोठा विजय मिळवला होता.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:BJP worker Khimchand Chandrani reached via bicycle from Gujarat to Delhi to congratulate PM Modi and Amit Shah