पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोना: महिनाभर सभा आणि आंदोलन न करण्याचा भाजपचा निर्णय

जे पी नड्डा

देशभरात कोरोना विषाणूने कहर केला असून रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपने महिनाभर सभा आणि कोणतेही आंदोलन न करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा यांनी बुधवारी ही माहिती दिली. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाला लक्षात घेता भाजपने हा निर्णय घेतला आहे. 

भीमा-कोरेगाव प्रकरण : शरद पवारांना साक्ष नोंदविण्यासाठी बोलावले

जे पी नड्डा यांनी पुढे असे देखील सांगितले की, पक्षाच्या सर्व नेते आणि कार्यकर्त्यांना कोरोना विषाणूबाबत जागरुकता वाढविण्यास सांगितले आहे. तसंच या विषाणूची लागण होऊ नये यासाठी काय केले पाहिजे आणि काय करु नये याबाबत देखील जनतेला माहिती देण्यास सांगितले आहे. तसंच, जर आम्हाला काही माहिती द्यायची असेल तर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्यामार्फत दिली जाईल, असे देखील त्यांनी सांगितले. 

कोरोनाशी असाही लढा, घरमालकाने घरभाडे केले माफ!

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील भाजपच्या संसदीय दलाच्या बैठकीमध्ये सर्वांना कोरोना विषाणूबाबत जनजागृती करण्याचे आदेश दिले. या बैठकीत त्यांनी सर्व खासदारांना छोट्या-छोट्या गटात कोरोना विषाणूबाबत जनजागृती करावी असे सांगितले. त्याचसोबत १ एप्रिलपर्यंत कोणतेही जनआंदोलन करु नका असे देखील आवाहन पंतप्रधानांनी केले. 

भारतामध्ये कोरोनाबाधितांची संख्या १४८ वर