पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कलम ३७० वर मनमोहन सिंग यांच्या विधानावरून काँग्रेस अडचणीत

मनमोहन सिंग

जम्मू-काश्मिरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द करण्याचे विधेयक जेव्हा संसदेच्या दोन्ही सभागृहांत आणले गेले. त्यावेळी काँग्रेसने या विधेयकाला विरोध केला नव्हता. विरोध फक्त हे विधेयक ज्या पद्धतीने संसदेत मांडण्यात आले, त्याला करण्यात आला होता, असे विधान काँग्रेस नेते आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी गुरुवारी मुंबईत पत्रकार परिषदेत केले होते. पण आता याच वक्तव्यावरून भाजपने काँग्रेसपुढे प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याचबरोबर कलम ३७० रद्द करण्याबद्दल काँग्रेसची अधिकृत भूमिका काय, असा प्रश्न उपस्थित केला आहे. याचे कारण म्हणजे याआधी ऑगस्ट महिन्यात काँग्रेस नेते मनिष तिवारी यांनी या विधेयकाच्या विरोधात काँग्रेसने मतदान केल्याचे म्हटले होते.

हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारींची गोळ्या झाडून निर्घृण हत्या

आता भाजपच्या नेत्यांनी याच मुद्द्यावरून मनमोहन सिंग यांच्यावर खोटे बोलल्याचा आरोप लावला आहे. भाजपच्या आयटी विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी शुक्रवारी एक ट्विट करून या मुद्द्यावरून मनमोहन सिंग यांना काँग्रेसने खोटे बोलण्यास भाग पाडल्याचा आरोप केला. कलम ३७० रद्द करण्याच्या मुद्द्यावर काँग्रेसची नक्की भूमिका काय, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

उत्तर प्रदेशात विद्यापीठ आणि कॉलेजमध्ये मोबाईलवर बंदी

काश्मीरमधील कलम ३७० रद्द करणे आणि या राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन करण्याच्या मुद्द्यावरून ऑगस्ट महिन्यात मनिष तिवारी यांनी पत्रकार परिषदेत काँग्रेसने या दोन्हीच्या विरोधात मतदान केल्याचे सांगितले होते. काँग्रेस कार्यकारिणीमध्ये यासंदर्भात एक ठरावही मंजूर करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले होते. आता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत हा मुद्दा भाजपकडून प्रचारात वापरला जात असताना गुरुवारी मुंबईत पत्रकार परिषदेत मनमोहन सिंग यांनी काँग्रेसने या विधेयकाच्या बाजूने मतदान केल्याचे सांगितले. त्यामुळे काँग्रेसच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.