पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भाजप प्रदेशाध्यक्षांच्या करंगळीला गंभीर जखम, शस्त्रक्रिया करावी लागणार

स्वतंत्र देव सिंह

भाजपचे उत्तर प्रदेशमधील अध्यक्ष आणि राज्यातील मंत्री स्वतंत्र देव सिंह सोमवारी एका कार्यक्रमात जखमी झाले. त्यांच्या हाताच्या बोटांना गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. डॉ. मुकेश जैन यांनी त्यांच्यावर उपचार केले.

दिल्ली ते लाहोर बससेवाही स्थगित

मुझफ्फरनगरमध्ये एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी स्वतंत्र देव सिंह आले होते. यावेळी त्यांच्या हातांची बोटे खिडकीमध्ये सापडल्यामुळे ते जखमी झाले. यामुळे त्यांच्यावर उपचारांसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. स्वतंत्र देव सिंह यांचे पुढील दिवसभरातील कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. कार्यक्रमात समर्थकांची झालेली गर्दी आणि ढिसाळ नियोजनामुळे स्वतंत्र देव सिंह जखमी झाल्याची माहिती मिळते आहे. 

Video : पाहा सामन्याला कलाटणी देणारा भुवीचा अप्रतिम झेल

उत्तर प्रदेशच्या गृह मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनानुसार स्वतंत्र देव सिंह यांच्या उजव्या हाताच्या करंगळीला जखम झाली आहे. डॉ. मुकेश जैन हे स्वतः त्यांच्यावर उपचार करीत आहेत. त्यांच्या बोटांवर शस्त्रक्रियाही करावी लागणार आहे, अशीही माहिती मिळाली आहे.