पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'राहुल यांच्यासाठी 'जिना' हेच आडनाव उपयुक्त', भाजप आक्रमक

राहुल गांधी (Photo by Raj K Raj/ Hindustan Times)

दिल्लीतील रामलीला मैदानावर काँग्रेसच्या भारत बचाओ रॅलीत आज (शनिवार) राहुल गांधी भाजपविरोधात कमालीचे आक्रमक दिसले. आपल्या 'रेप इन इंडिया' या वक्तव्यावरुन भाजपने केलेली माफीची मागणी फेटाळताना माझे नाव राहुल सावरकर नाही. मी कधीच माफी मागणार नाही, असे म्हटले. त्यांच्या या वक्तव्यावर भाजपकडून तीव्र प्रतिक्रिया आल्या आहेत. केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी राहुल गांधी यांचे आडनावच उधार असल्याचे टि्वट केले आहे. तर दुसरीकडे भाजपचे प्रवक्ते आणि राज्यसभा सदस्य जीव्हीएल नरसिंहा राव यांनी राहुल यांना जिना हे आडनाव वापरण्याचा सल्ला दिला आहे. राहुल जिना हेच योग्य नाव असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे. याचदरम्यान भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनीही राहुल यांच्यावर निशाणा साधला आहे. राहुल यांनी हजार जन्म घेतले तरी ते कधीच राहुल सावरकर बून शकणार नाहीत, असे ते म्हणाले.

शिवसेनेने मूळ बाणा दाखवावा, भीतीची गरज नाहीः आशिष शेलार

गिरिराज सिंह यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर पलटवार करताना टि्वट केले की, वीर सावरकर हे सच्चे देशभक्त होते..उधारीचे आडनाव घेऊन कोणी गांधी होत नाही. कोणी देशभक्त बनत नाही..देशभक्त होण्यासाठी रक्तात शुद्ध भारतीय रक्त असायला हवे. वेश बदलून अनेकांनी भारताला लुटले आहे, आता हे होणार नाही. हे तिघे कोण आहेत?, हे तिघे देशाचे सामान्य नागरिक आहेत का?

मी मरण पत्करेल पण माफी मागणार नाही: राहुल गांधी

जीव्हीएल नरसिंहा राव यांनीही तिखट प्रतिक्रिया देताना म्हटले की, राहुल यांचे नाव जिना असायला हवे. तुमचे मुस्लिम तुष्टीकरणाचे राजकारण आणि मानसिकता तुम्हाला सावरकर यांचा वारसा नव्हे तर मोहम्मद अली जिना यांचा योग्य वारसदार असल्याचे दर्शवते. 

संबित पात्रा म्हणाले की, राहुल गांधींनी हजार जन्म घेतले तरी ते राहुल सावरकर बनू शकणार नाहीत. जर नावच बदलायचे असेल तर आजपासून आम्ही त्यांना 'थोड़ा-शर्मकर' या नावाने बोलवू. जी व्यक्ती मेक इन इंडियाला रेप इन इंडिया म्हणत असेल तर त्याला तेच नाव योग्य आहे.