पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भाजपला मिळणार नवे राष्ट्रीय अध्यक्ष, ... या नावावर शिक्कामोर्तब

अमित शहा

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी जे पी नड्डा यांची निवड होण्याची औपचारिकता सोमवारीच पूर्ण केली जाईल. गेल्या वर्षभरापासून जे पी नड्डा हे भाजपचे कार्यकारी अध्यक्ष आहेत. पण आता या पदावर त्यांची औपचारिकपणे बिनविरोध निवड केली जाईल. भाजपमध्ये एका व्यक्तीकडे एकच पद असते. तरीही २०१९ मधील लोकसभा निवडणूक झाल्यावर अमित शहा यांच्याकडे केंद्रीय गृहमंत्री आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ही दोन्ही पदे होती. त्यावेळी नड्डा यांची कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. आता राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून अमित शहा पायउतार होत असून, ती सूत्रे नड्डा यांच्याकडे येतील.

सरन्यायाधीश शरद बोबडेंनी क्रिकेट सामन्यात केल्या १८ धावा तरीही...

जे पी नड्डा यांचा अर्ज भरण्यासाठी सोमवारी दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात अनेक नेते येण्याची शक्यता आहे. जून २०१९ मध्ये जे पी नड्डा यांची पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड झाली होती. जे पी नड्डा हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. साधारणपणे दहा वर्षांपासून ते पक्षाच्या राष्ट्रीय रचनेत महत्त्वाच्या पदावर कार्यरत आहे. 

विद्यार्थी चळवळींपासून जे पी नड्डा हे भाजपशी संबंधित आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी चांगले संबंध आणि स्वच्छ प्रतिमा यामुळे जे पी नड्डा यांची निवड भाजपतील सर्वोच्च पदासाठी निश्चित करण्यात आली. 

अमर, अकबर, अँथनीचे सरकार जास्त टिकणार नाही: रावसाहेब दानवे

रविवारी संध्याकाळी अमित शहा यांनी पक्षातील सर्व ज्येष्ठ नेत्यांसोबत एक बैठक घेतली. या बैठकीला पक्षाचे केंद्रीय मंत्री, भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. या बैठकीत अध्यक्षपदाच्या निवडीसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.