पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नाराज एकनाथ खडसेंनी दिल्लीत शरद पवारांची घेतली भेट

एकनाथ खडसे

भाजपवर नाराज असलेले पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी सोमवारी सांयकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीत भेट घेतली. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांना भेटायला गेलेल्या खडसे यांनी पवार यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे ३५ मिनिटे चर्चा झाल्याचे सांगण्यात येते. बैठकीनंतर प्रसारमाध्यमांना भेटणे खडसे यांनी टाळले. 

..तर मला वेगळा विचार करावा लागेल, नाराज खडसेंचा पक्षश्रेष्ठींना इशारा

पक्ष नेतृत्वाला भेटण्यासाठी खडसे हे दिल्लीत गेले होते. परंतु, त्यांची आज कोणत्याच नेत्यांबरोबर भेट होऊ शकली नाही. सायंकाळी खडसे यांनी ६ जनपथ या शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. भेटीत काय चर्चा झाली हे समजू शकलेले नाही. 

हैदराबाद एन्काऊंटरवर राज ठाकरे म्हणाले की,...

दोनच दिवसांपूर्वी जळगाव येथे खडसे यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन आपली नाराजी व्यक्त केली होती. तसेच मुलगी रोहिणी खडसे यांचा पराभव पक्षातील लोकांनीच केल्याचा आरोप करत त्यांनी तसे पुरावे पाटील यांना सादर केले होते. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपच्या काही नेत्यांचे नाव न घेता हल्लाबोल केला होता.

कर्नाटक निकालांनंतर देवेंद्र फडणवीसांचे सूचक ट्विट