पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भाजप-शिवसेनेतील तिढ्यामुळे संसद अधिवेशनाचा कार्यक्रम अद्याप अनिश्चित

उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस

सत्तास्थापनेवरून महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेनेत सुरू असलेली तू तू मै मै यामुळे निकाल लागून दोन आठवडे होत आले तरी अद्याप नक्की कोणाचे सरकार येणार, कोण मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट झालेले नाही. पण या दोन्ही मित्रपक्षातील वादाचा परिणाम आता केंद्रीय राजकारणावरही होऊ लागला आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कार्यक्रमाचे नियोजनही यामुळे करता येत नसल्याचे पक्षाच्या नेत्यांनी नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले. भाजपचे वरिष्ठ नेते महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा तिढा सोडविण्यात गुंतले असल्याने संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा सरकारी कार्यक्रम अजून निश्चित करण्यात आलेला नाही.

'युतीला बहुमत असल्याने भाजप-सेनेनेच सत्ता स्थापन करावी'

भाजपच्या नेत्याने सांगितले की, हिवाळी अधिवेशनासाठी भाजपचा कार्यक्रम निश्चित करण्याचे काम पक्षातील वरिष्ठ नेतेच करतात. पण यातील बहुतांश नेते सध्या महाराष्ट्रात सत्तास्थापन करण्याच्या प्रयत्नात गुंतले आहेत. पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सुद्धा याच कामात व्यग्र आहेत. त्यामुळे हिवाळी अधिवेशनाचा अजेंडा अद्याप निश्चित झालेला नाही. 

संसदेच्या दोन्ही सभागृहांचे हिवाळी अधिवेशन १८ नोव्हेंबरपासून सुरू होते आहे. त्यामुळे आमच्याकडे अजून वेळ आहे. आता अधिवेशनाच्या एक आठवडा आधी आम्ही कार्यक्रम निश्चित करण्याकडे लक्ष देऊ, असेही एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील दोन पक्षांच्या नेत्यांनी सांगितले की आम्हाला अद्याप सरकारकडून अधिवेशनात कोणती सरकारी विधेयके मांडण्यात येतील. त्याबद्दल आपण काय भूमिका घ्यायला हवी, याबद्दल काहीच सांगण्यात आलेले नाही. १८ नोव्हेंबर ते १३ डिसेंबर या कालावधीत हिवाळी अधिवेशन असणार आहे.

काळजीवाहू सरकारला महाराष्ट्राची काळजी नाही: बाळासाहेब थोरात

सर्वसाधारणपणे संसदेच्या कोणत्याही अधिवेशनाच्या खूप आधी सरकार पक्षाकडून अधिवेशनाचा कार्यक्रम निश्चित केला जातो. संसदीय कामकाजा संदर्भातील मंत्रिगटाची बैठक १६ ऑक्टोबरला झाली. त्यामध्ये अधिवेशनाचा कालावधी निश्चित करण्यात आला. पण कार्यक्रम अजून निश्चित झालेला नाही. त्याबद्दल मित्रपक्षांना कोणतीही पूर्वकल्पनाही देण्यात आलेली नाही.