पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काँग्रेसकडून 'या' स्वातंत्र्य सैनिकांना भारतरत्न देण्याची मागणी

काँग्रेस

भाजपकडून वीर सावरकर यांना भारतरत्न देण्याची मागणी समोर आल्यानंतर आता काँग्रेसने भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु यांना देशाचा सर्वोच्च पुरस्कार देण्याची मागणी केली आहे. भाजपकडून नुकताच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात सावरकर यांना भारतरत्न देण्याची मागणी करणार असल्याचा उल्लेख करण्यात आला होता. तेव्हापासून सावरकर यांना भारतरत्न देण्यावरुन वाद रंगला होता. 

'सेनेकडे पर्याय आहेत मात्र ते स्वीकारण्याचे पाप माथी नको'

यामुद्द्यांवरुन विविध राजकीय पक्ष विखुरले गेल्याचे दिसत आहे. इतकेच नव्हे तर काँग्रेसमध्येही मतमतांतरे आढळून आली आहेत. काँग्रेसचे नेते मनीष तिवारी यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य सैनिक भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांना मरणोपरांत भारतरत्न देण्याचे आवाहन केले आहे. 

एका टि्वटमध्ये तिवारी म्हणाले की, त्यांनी पंतप्रधानांना औपचारिकरित्या एक पत्र लिहिले आहे. त्यामध्ये भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांना भारतरत्न देण्याची विनंती केली आहे. त्याचबरोबर चंदीगड विमानतळ भगतसिंग यांच्या स्मृतीनिमित्त समर्पित करण्याची विनंती केली आहे. त्यांनी या तिघा शहिदांना 'शहीद ए आझम' पुरस्काराने सन्मानित करण्याची मागणी केली. 

न्या. शरद बोबडे यांची सरन्यायाधीशपदी नियुक्ती

आपल्या पत्रात तिवारी म्हणतात की, भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांनी २३ मार्च १९३१ ला आपले बलिदान दिले. त्यांच्यामुळे एक संपूर्ण पिढी प्रेरित झाली. त्यांना येत्या २६ जानेवारी २०२० मध्ये या तिघा शहिदांना भारतरत्न दिला यावा.

दुसरीकडे काँग्रेसचे दुसरे नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी सावरकर हे एक राष्ट्रवादी होते, असे म्हटले. ते एक कुशल व्यक्ती होते. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी महत्वाची भूमिका निभावली, दलितांच्या हक्कांसाठी लढाई लढला आणि देशासाठी कारावासही भोगला, असे त्यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले.

बोअरवेलचा आणखी एक बळी, ७५ तासांचे प्रयत्न अयशस्वी

दरम्यान, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मुंबईतील एका पत्रकार परिषदेत काँग्रेस सावरकरविरोधात नाही. ते केवळ त्यांच्या हिंदुत्व विचारधारेचा विरोध केला जातो असे, त्यांनी म्हटले होते.

IPL 2020 : या पाच गोलंदाजांवर असतील बंगळूरुच्या नजरा