पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जिथे हिंसाचार झाला तिथे पुन्हा मतदान घ्या, भाजपची मागणी

केंद्रीय मंत्री पियुष गोयल

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील मतदानावेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्याची तक्रार करण्यासाठी भाजप नेत्यांनी सोमवारी निवडणूक आयोगाच्या कार्यालयात धाव घेतली. त्याचबरोबर त्यांनी पश्चिम बंगालसह काही मतदारसंघात पुन्हा मतदानाची मागणी केली आहे. निवडणूक आयोगाला हिंसेची सर्व विस्तृत माहिती दिल्याचे केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. 

कमलनाथ सरकार अल्पमतात, भाजपचा राज्यपालांकडे दावा

गोयल म्हणाले, आम्ही निवडणूक आयोगाला आमच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या हिंसाचाराविषयी माहिती दिली आहे. जिथे सातव्या आणि पहिल्या टप्प्यात आणि प्रामुख्याने पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार झाला. तिथे आम्ही पुन्हा मतदानाची मागणी केली आहे,

पश्चिम बंगालमध्ये ४२ जागा आहेत. तिथे सात टप्प्यात मतदान झाले आणि प्रत्येक टप्प्यात तिथे हिंसाचार झाला. मतदानाच्या अखेरच्या दिवशीही सत्तारुढ तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) कार्यकर्त्यांकडून भाजप कार्यकर्ते आणि उमेदवारांवर हल्ला केल्याचा आरोप केला जात आहे.

एक्झिट पोलनुसार 'ती' अन्य जागा कुणाकडे

बारासात मतदारसंघातील राजारहाट येते भाजपच्या कार्यालयात आग लावण्यात आली होती. मथुरापूर येथील रायडीहमध्ये गावठी बॉम्ब फेकण्यात आले. तसेच टीएमसी कार्यकर्त्यांनी मतदारांना धमकावलेही होते. बसीरहाट येथे टीएमसी आणि भाजप समर्थकांमध्ये हाणामारी झाली होती. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:BJP requests election commission to conduct repolling in booths affected by violence in the Lok Sabha polls