पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कॉलेजला जाणाऱ्या गरीब विद्यार्थीनींना स्कुटी, दिल्लीत भाजपचे आश्वासन

कॉलेजला जाणाऱ्या गरीब विद्यार्थीनींना स्कुटी, दिल्लीत भाजपचे आश्वासन

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी शुक्रवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि भाजपच्या इतर ज्येष्ठ नेत्यांनी 'संकल्प पत्र' जारी केले आहे. या संकल्पपत्राला भाजपने 'गागर में सागर' असे नाव दिले आहे. या वेळी गडकरी यांनी दिल्ली हे देशाचे हृदय असून हे शहर सर्व भारतीयांसाठी अभिमानाचा विषय असल्याचे म्हटले. संपूर्ण देशाचा इतिहास दिल्लीशी निगडीत आहे. भाजपचा इतिहासही दिल्लीशी निगडीत असल्याचे ते म्हणाले. 

आम्ही प्रत्येकवेळी दिल्लीचे नशीब, दिल्लीचे भविष्य बदलण्याचे काम केले आहे. येत्या तीन वर्षांत दिल्लीच्या जनतेला १२ तासांत कारने मुंबईला पोहोचता येईल. येथील आजूबाजूची जमीन खूप स्वस्त आहे. ११ लाख लोकांच्या सुचनेनंतर हे संकल्प पत्र तयार केले असल्याचे त्यांनी सांगितले. 

निर्भया प्रकरणातील चारही दोषींच्या फाशीला स्थगिती

भाजपचे आश्वासनातील काही महत्त्वाचे मुद्दे..

१. दिल्लीला भ्रष्टाचारमुक्त पारदर्शक सरकार देणार. आपच्या मागील ५ वर्षांतील सरकारमधील अर्धे मंत्री आणि आमदार एकतर जामिनावर आहेत किंवा आरोप सिद्ध झालेले आहेत.

२. नवीन अधिकृत कॉलनींच्या विकासासाठी कॉलनी डेव्हल्पमेंट मंडळ उभारणार. 

३. भाडेकरुंच्या हिताचे रक्षण केले जाईल.

४. गरिबांना दोन रुपये किलोने पीठ दिले जाईल.

निर्भयाच्या आईला दोषींच्या वकिलांनी दिले आव्हान, म्हणाले...

५. टँकर मुक्त दिल्ली करणार. प्रत्येकाच्या नळाला पाणी देणार.

६. सत्तेवर येताच आयुष्मान योजना, प्रधानमंत्री आवास योजना आणि किसान सन्मान निधी योजना लागू करणार. 

७. १० नवीन महाविद्यालये आणि २०० नवीन शाळा सुरु करणार.

८. बेटी पढाओ-बेटी बचाओ अभियानाअंतर्गत गरीब कुटुंबातील मुलीच्या खात्यात पैसे टाकणार. मुलगी २१ वर्षांची झाल्यानंतर दोन लाख रुपये देणार.

९. महाविद्यालयाला जाणाऱ्या गरीब विद्यार्थीनींना स्कुटी देणार.

१०. नववीतील मुलींना मोफत सायकल देणार

११. गरीब विधवा महिलांच्या मुलींच्या लग्नासाठी ५१ हजार रुपये देणार.

१२. दिल्लीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून मुक्त करणार

मॅच सुपर ओव्हरमध्ये कशी न्यावी हे न्यूझीलंडकडून शिकावं!

१३. कॉन्ट्रक्टवर काम करणाऱ्यांना नोकरीची सुरक्षा देणार

१४. यमुना नदी आणि तिच्या आसपासचा परिसर स्वच्छ आणि विकसित करण्यासाठी दिल्ली यमुना विकास मंडळाची स्थापना करणार.

१५. सरकारी कर्मचाऱ्यांच्या हितांचे रक्षण करण्यासाठी दिल्लीतील रुग्णालये, सरकारी शाळा आणि इतर सर्व सरकारी संस्थांमध्ये कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना वयाच्या ५८ व्या वर्षापर्यंत काम देण्याची गॅरंटी.