पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

CAA: भाजपने समोर आणला मनमोहन सिंग यांचा जुना व्हिडिओ

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग

सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात देशातील वेगवेगळ्या भागात मोठ्याप्रमाणात आंदोलन सुरु आहे. डाव्या पक्षांनी आज भारत बंद पुकारला आहे. त्याच्या समर्थनात अनेक विरोधी पक्षांनीही भाग घेतला. याचदरम्यान काँग्रेसला घेरण्यासाठी भाजपने माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा २००३ मधील राज्यसभेत केलेल्या वक्तव्याचा व्हिडिओ समोर आणला आहे. व्हिडिओमध्ये मनमोहन सिंग बांगलादेशमध्ये धार्मिक आधारावर हिंसेचे बळी पडलेल्या शरणार्थींसाठी सरकारला सहानुभूतीपूर्वक वागणूक देण्याची सूचना केली आहे.

नागरिकत्व कायदाः लखनऊ-अहमदाबादमध्ये आंदोलनाला हिंसक वळण

२००३ मध्ये केंद्रात अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार होते. त्यावेळी राज्यसभा सदस्य मनमोहन सिंग हे विरोधी पक्षनेते होते. त्यावेळी सभागृहात उपस्थित उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना उद्देशून म्हटले की, मी शरणार्थींचे संकट तुमच्यासमोर ठेवू इच्छितो. फाळणीनंतर आपल्या शेजारील देश बांगलादेशमध्ये धार्मिक आधारावर नागरिकांचा छळ केला गेला. जर हे लोक आपल्या देशात शरण घेण्यासाठी आले तर त्यांना शरण देणे आपली नैतिक जबाबदारी आहे. त्यांना शरण देण्यासाठी आपली वर्तणूक उदारपूर्ण असली पाहिजे. मी गंभीरतेने नागरित्व दुरुस्ती विधेयकाकडे उपपंतप्रधानांचे लक्ष वेधू इच्छितो.

दिल्ली आंदोलन: काही मेट्रो स्टेशन सुरु, वाहतूक कोंडीमुळे प्रवासी हैराण

काँग्रेस धार्मिक आधारावर शरणार्थींना नागरिकत्व देण्यासाठी केंद्र सरकारवर हल्ला करत आहे. इतर विरोधी पक्षही नागरिकत्व कायद्याचा विरोध करत आहेत. अशावेळी माजी पंतप्रधानांच्या राज्यसभेत केलेले वक्तव्य भाजपने समोर आणले आहे. आता मनमोहन सिंग यांच्या वक्तव्यावर राजकीय वाद होणे निश्चित असल्याचे मानले जात आहे. भाजपने हा व्हिडिओ आपल्या टि्वटरवर पिनही केले आहे.