पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राफेलची पूजा केल्यानंतरही काँग्रेसला वाईट वाटलेः अमित शहा

अमित शहा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राफेलच्या निमित्ताने काँग्रेसवर जबरदस्त टीका केली आहे. काँग्रेस राफेलच्या पुजेलाही विरोध करते, असे त्यांनी म्हटले. काँग्रेसचे नेते संदीप दीक्षित यांच्यानंतर पक्षाचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनीही संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलेल्या पुजेवर हल्लाबोल केला होता. पूजा-पाठ हा तमाशा असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यावरुनच शहा यांनी काँग्रेसवर टीका केली. यावेळी त्यांनी कलम ३७० वरुनही काँग्रेसला घेरले.

जागतिक आर्थिक मंदीचा भारतावरही परिणामः आयएमएफ प्रमुख

हरियाणामधील कॅथल येथील प्रचारसभेत ते बोलत होते. 'अबकी बार ७५ पार' ही घोषणा देताना त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी राफेलचे शस्त्र पूजन केले. काँग्रेसला हे पसंत पडले नाही. विजयादशमीच्या दिवशी 'शस्त्र पूजन' केले जात नाही का, असा सवाल त्यांनी केला. आता काँग्रेसने कधी आणि कोणत्या विषयावर टीका करावी याचा विचार करायला हवा, असे ते म्हणाले.

दरम्यान, अमित शहा पुढे म्हणाले की, राफेल आम्ही हल्ल्यासाठी वापरणार नाही. आत्मसंरक्षणासाठी हे विमान घेतले आहे. मी पंतप्रधान आणि संरक्षण मंत्र्यांचे अभिनंदन करतो की त्यांनी राफेलचा हवाईदलात समावेश करुन देशाची सुरक्षा सुदृढ करण्याचे काम केले आहे.

पाकिस्तानी आहात का?, भरसभेत भाजपच्या उमेदवाराने उपस्थितांना विचारला प्रश्न

मंगळवारी विजयादशमी होती. या दिवशी शस्त्र पूजन केले जाते. मला समजत नाही की काँग्रेस शस्त्र पुजेला का विरोध करते, असा सवाल त्यांनी केला.