दिल्लीतील कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केजरीवाल सरकारवर निशाणा साधला. या सरकारने जनतेचा भ्रमनिरास केला आहे. जनता त्यांना आगामी निवडणुकीत योग्य ती जागा दाखवेल, असे सांगत दिल्लीत सत्ता परिवर्तन होणार असल्याचा विश्वास शहांनी व्यक्त केला. दिल्लीकरांनो तुम्हाला दंगल घडवून आणणारे सरकार हवे आहे का? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी विरोधकांवर तोफ डागली.
नाराज नाही पण बदनाम करणाऱ्यांची माहिती CM ठाकरेंना दिलीः सत्तार
मागील पाच वर्षांत केजरीवाल सरकारने काम केले नाही. कार्यकाळ संपत आल्यानंतर ते कामाला लागले आहेत, असा आरोपही शहांनी यावेळी केला. अनेक वृत्तपत्रात आपल्या फोटोसह जाहिरात प्रसिद्ध करणाऱ्या केजरीवालांनी कामाचा आढावा द्यावा. सरकार जनतेची फसवणूक करत आहे. दिल्लीची जनता आगामी निवडणुकीत केजरीवाल सरकारचा हिशोब चुकता करेल, अशा आशयाचे वक्तव्य शहांनी केले. आगामी निवडणूक ही केवळ प्रचार सभेच्या माध्यमातून नाही तर लोकांच्या घरा-घरामध्ये जाऊन लढायची आहे, असा सल्लाही त्यांना भाजपच्या कार्यकर्त्यांना दिला.
कोणत्याही परिस्थितीत पुढील सुनावणीस हजर राहा, फडणवीसांना कोर्टाचे आदेश
स्नानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत दिल्लीच्या जनतेने आम आदमी पक्षाला नाकारले आहे. विधानसभेत देखील हिच परिस्थिती दिसेल, असा विश्वास शहांनी यावेळी व्यक्त केला. १९८४ मधील शिखांच्या विरोधातील दंगलीचा दाखला देत त्यांनी काँग्रेसवरही निशाणा साधला. दंगलीतील पीडितांसाठी काँग्रेसने कधीच पुढाकार घेतला नाही. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने दंगल पीडित कुटुंबियांना ५ लाख रुपये मदत दिली. एवढेच नाही तर दंगलीतील दोषींना शिक्षा देखील दिल्याचे शहा म्हणाले.