पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अमित शहा, रविशंकर प्रसाद, कनिमोळी यांचा राज्यसभेचा राजीनामा

अमित शहा आणि रविशंकर प्रसाद

लोकसभेवर निवडून आल्यामुळे भाजपचे अध्यक्ष अमित शहा, मावळत्या सरकारमधील केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद आणि द्रमुकच्या नेत्या कनिमोळी यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. राज्यसभा सचिवालयाकडून बुधवारी ही माहिती देण्यात आली. 

लोकसभा निवडणुकीत अमित शहा गुजरातमधील गांधीनगर मतदारसंघातून जिकले आहेत. तर रविशंकर प्रसाद हे पाटणा साहिबमधून विजयी झाले आहेत. त्यांनी ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा पराभव केला. कनिमोळी या तामिळनाडूतील थोतुकुडी मतदारसंघातून विजयी झाल्या. नियमाप्रमाणे संसदेच्या दोन्ही सभागृहांचे एकाचवेळी सदस्य राहता येत नाही. त्यामुळे या तिघांनी आपल्या सदस्यत्वाचे राजीनामे दिले आहेत. आता त्यांच्या जागी पुन्हा नव्याने निवडणूक होईल. अमित शहा हे गुजरातमधून, रविशंकर प्रसाद बिहारमधून तर कनिमोळी तामिळनाडूमधून राज्यसभेवर गेल्या होत्या.

मोदींच्या 'त्या' निर्णयामुळे ममता बॅनर्जी शपथविधीला जाणार नाहीत

अमित शहा पहिल्यांदा लोकसभेमध्ये निवडून आले आहेत. ऑगस्ट २०१७ मध्ये पहिल्यांदा ते राज्यसभेवर निवडून आले होते. गांधीनगरमधून निवडणूक लढताना त्यांनी काँग्रेसचे उमेदवार सी. जे. चावडा यांना ५.५७ लाख मतांनी हरविले.