कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावच्या भीतीने देशभरातील अनेक कारागृहातील कैद्यांना सोडण्याचा विचार केला जात आहे. त्याचदरम्यान भाजपचे राज्यसभा सदस्य सुब्रमण्यम स्वामी यांनी आसाराम बापूच्या मुक्ततेची मागणी केली आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी कारागृहाची हवा खात असलेला आसारामच्या वयोमान आणि आजाराचे कारण देत स्वामी यांनी त्याच्या मुक्ततेची मागणी केली आहे.
कोरोनामुळे देशात लागू होणार आणीबाणी? लष्कराने सांगितले सत्य
जोधपूरच्या मध्यवर्ती कारागृहात बंद असलेल्या १३७५ कैद्यांमध्ये आसाराम बापू हाही एक आहे. काही दिवसांपूर्वी कोरोनाच्या बहाण्याने स्वतःला पॅरोलवर सोडण्याची मागणी करत आसाराम उपोषणाला बसल्याचे सांगण्यात आले होते. आसारामला कोरोनामुळे कैद्यांमध्ये राहण्याची भीती वाटत आहे.
If convicted prisoners are being released by Government then the falsely found guilty and 85 year old ailing Asaram Bapu should be released first
— Subramanian Swamy (@Swamy39) March 30, 2020
सुब्रमण्यम स्वामी यांनी सोमवारी एक टि्वट केले आणि म्हटले की, जर दोषींना सोडले जात असेल तर ते चुकीच्या पद्धतीने दोषी ठरवण्यात आलेले ८५ वर्षीय आजारी आसाराम बापूंना सर्वांत आधी सोडले पाहिजे.
वीज ग्राहकांना मोठा दिलासा, १ एप्रिलपासून कपातीसह लागू होणार नवे दर
सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी एका याचिकेवर सुनावणी करताना म्हटले होते की, कोरोना विषाणूच्या धोक्यामुळे कारागृहातील व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. क्षमतेपेक्षा अधिक संख्येने कैदी असल्याने राज्यसरकारांना काही कैद्यांना पॅरोलवर सोडण्याचा उपाय सुचवण्यात आला होता. ज्यांची वर्तणूक चांगली असते, अशा कैद्यांना पॅरोलवर सोडण्यात येते.
सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेवर उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांनी कैद्यांना सोडण्याची तयारी सुरु केली आहे. अशात सुब्रमण्यम स्वामी यांनीही आसाराम बापूला सोडण्याची मागणी केली आहे.
जगात दीड लाख कोरोनाग्रस्त रुग्ण बरे,८० % जणांना रुग्णालयाची नाही गरज
जोधपूर जवळील आसाराम यांच्या आश्रमात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर आसारामने बलात्कार केल्याचा आरोप होता. १ ऑगस्ट २०१३ ला हे प्रकरण उघडकीस आले. ३१ ऑगस्ट २०१३ ला आसारामला इंदूर येथून अटक करण्यात आली होती. तर २५ एप्रिलला जोधपूरच्या न्यायालयाने त्याला अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरवले होते. तेव्हापासून आसाराम बापू कारागृहात कैद आहे.