पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आम्ही संत-मुनींची संतती, माकडांची नव्हेः भाजप खासदार सत्यपाल सिंह

खासदार सत्यपाल सिंह

भाजपचे खासदार सत्यपाल सिंह यांनी पुन्हा एकदा चार्ल्स डार्विनच्या सिद्धांताला आव्हान दिले आहे. शुक्रवारी मानवाधिकार संरक्षण (दुरुस्ती) विधेयक २०१९ चा विरोध करण्यावरुन विरोधी पक्षांवर टीका करताना ते म्हणाले की, भारतीय संस्कृतीत कुठेही मानवाधिकाराबाबत उल्लेख नाही. याउलट सदाचारी मानवी चरित्रावर जोर दिला गेला आहे. यावर न थांबता त्यांनी चार्ल्स डार्विन यांच्या सिद्धांतालाच खोटे ठरवण्याचा प्रयत्न केला.

लोकसभेत विधेयकावरील चर्चेत भाग घेताना मुंबईचे माजी पोलिस आयुक्त राहिलेले सत्यपाल सिंह म्हणाले की, मानव प्रकृतीची विशेष रचना आहे. आम्ही भारतीय संतांची संतती आहोत असे, आम्ही मानतो. जे स्वतःला माकडाची संतती मानतात, आम्ही त्यांच्या भावनेला ठेस पोहोचवू इच्छित नाही. आपल्या संस्कृतीत मानवीय चारित्राच्या निर्मितीवर भर दिला जातो. आपल्या वेदांमध्ये  सदाचारी मानव होणे आणि चांगल्या मानवाची उत्पत्ती करण्याचे शिक्षण दिले आहे. आपली संस्कृती ही चांगला मानव होण्यावर जोर देते. 

कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष म्हणतात, आता चर्चा खूप झाली

ते म्हणाले, मंदिर, मशीद, गुरुद्वारा आणि चर्चला जाणे म्हणजे धर्माची कसोटी पूर्ण करणे नव्हे. धर्मानुसार, आम्ही त्याप्रमाणेच वर्तणूक केली पाहिजे, ज्याप्रमाणे आपण दुसऱ्याकडून वर्तणुकीची अपेक्षा करतो. जर आपल्याला वाटत असेल की कोणी मला त्रास देऊ नये. तर आपणही दुसऱ्याला त्रास दिला नाही पाहिजे, हाच धर्म आहे.

काय आहे डार्विन थिअरी
चार्ल्स डार्विन यांनी 'द ओरिजन ऑफ स्पिसीज' या आपल्या पुस्तकात झाडं आणि सजीव प्राण्यांना देवाने वेगवेगळे तयार केल्याचे अमान्य केले आहे. त्यांच्या मते, हे सर्व जीव काही जीवांचे वंशज आहेत. त्यामध्ये काळानुसार परिवर्तन होत गेले. मासे जल-थल जंतूंमध्ये बदलले गेले आणि माकडाचे मनुष्यात रुपांतर झाले.

पाच ट्रिलियन डॉलरचा टप्पा आधीच्या सरकारांमुळेच शक्य - प्रणव मुखर्जी