पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

रुपा गांगुलींच्या मुलाच्या गाडीचा अपघात, गाडी थेट भिंतीला धडकली, पोलिसांकडून अटक

अपघाताचे घटनास्थळाचे छायाचित्र

भाजपच्या राज्यसभेतील खासदार रुपा गांगुली यांच्या मुलाने त्याची गाडी दक्षिण कोलकातामधील गोल्फ गार्डन भागातील एका भिंतीला धडकावली. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार यावेळी गांगुली यांचा मुलगा आकाश मुखोपाध्याय मद्याच्या नशेत होता. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार पोलिसांनी आकाशला अटक केली आहे.

काश्मिरवर सुरक्षा परिषदेत बंद दरवाजाआड चर्चा

गुरुवारी रात्री ही घटना घडली. आकाश त्याची सेदान श्रेणीतील गाडी अत्यंत वेगाने चालवित होता, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. गाडीवरील ताबा सुटल्याने ती एका भिंतीला जाऊन धडकली. या अपघातात आकाश याला कोणतीही जखम झालेली नाही. त्याचवेळी जिथे अपघात घडला तिथे काही लोक होते. ते सुद्धा या अपघातातून थोडक्यात बचावले. 

प्रतक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, गाडी खूप जोरात निघाली होती. गाडी चालविणारी व्यक्ती मद्याच्या नशेत असावी, असे आम्हाला संबंधित व्यक्ती गाडी चालवताना बघून वाटले. ज्यावेळी ही घटना घडली. त्यावेळी गाडीत आकाश एकटाच होता. त्यानंतर स्थानिकांच्या मदतीने तो गाडीतून बाहेर आला. अपघाताची माहिती मिळताच त्याचे वडीलही लगेचच घटनास्थळी आले.